Fatty Liver Diseases: Dainik Gomatak
लाइफस्टाइल

Fatty Liver: सावधान! 'फॅटी लिव्हर'ने वाढतोय ह्रदयविकाराचा धोका, जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

Fatty Liver Diseases: फॅटी लिव्हरमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

Manish Jadhav

Fatty Liver Causes Symptoms Heart Disease Risk

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरची समस्या झपाट्याने वाढत आहे. जेव्हा लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होऊ लागते तेव्हा हा आजार होतो. सुरुवातीला, त्याची फारशी लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु जर तो वेळीच नियंत्रित केला नाही तर तो हृदयरोगास कारणीभूत ठरु शकतो. डॉक्टरांचे मते, फॅटी लिव्हरमुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

फॅटी लिव्हर आणि हृदयरोग

दरम्यान, जेव्हा लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होते तेव्हा ती इंफ्लेमेशन निर्माण करते, ज्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) कमी होते. यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोका वाढतो. रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या समस्या देखील फॅटी लिव्हरमुळे होऊ शकतात, ज्यामुळे हृदय आणखी कमकुवत होते. फॅटी लिव्हरच्या परिणामामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात.

कोणाला जास्त धोका आहे?

ज्या लोकांना लठ्ठपणा, मधुमेहाची समस्या आहे त्यांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, त्यांनी त्यांच्या जीवनशैलीत तात्काळ बदल करावा.

कोणत्या लक्षणांमुळे तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे?

फॅटी लिव्हरची लक्षणे हळूहळू दिसून येतात, परंतु जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांनी संपर्क साधा. पोटाच्या उजव्या बाजूला हलक्या वेदना किंवा जडपणा जाणवणे, सतत सुस्त आणि अशक्त वाटणे, भूक न लागणे किंवा अन्न पचवण्यात अडचण येणे, वजन जलद वाढणे किंवा कमी होणे ही फॅटी लिव्हरची लक्षणे आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्यास हलक्यात घेऊ नका. त्वरीत डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.

लिव्हर आणि हृदय कसे निरोगी ठेवावे?

जर तुम्हाला तुमचे लिव्हर आणि हृदय दोन्ही निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करावे लागतील.

आहार- जंक फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त गोड पदार्थ खाणे टाळा. हिरव्या भाज्या, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा.

नियमित व्यायाम करा- दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करा.

दारु आणि सिगारेट टाळा- दारु आणि धूम्रपान लिव्हरला हानी पोहोचवतात. त्यामुळे ते टाळा.

वजन नियंत्रणात ठेवा- लठ्ठपणा केवळ लिव्हरसाठीच नाही तर हृदयासाठीही धोकादायक आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.

पुरेशी झोप घ्या- कमी झोपेमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होते, ज्याचा लिव्हर आणि हृदयावर वाईट परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RO RO Ferry: ..आता मुंबईतून सिंधुदुर्गात पोचणार झटक्यात! रो - रो सेवेची चाचणी; बोटीचे विजयदुर्ग बंदरात आगमन

Goa Water Supply: 'प्रत्येकाला सरासरी 12 तास पाणीपुरवठा करू', मंत्री फळदेसाईंचा दावा; गळती कमी करण्यासाठी ठोस पावले उचलणार

New GST Rates: गोव्‍यातील कॅसिनो उद्योगासाठी धक्‍का! जीएसटी 40 टक्‍के; पर्यटन, इतर व्यवसायांना फटका बसण्याची शक्यता

Usgao Theft: दार तोडले, महिलेच्या तोंडात कोंबला बोळा! पालवाडा-उसगावात चोरांचा धुमाकूळ; 4 लाखांचा ऐवज लंपास

Rashi Bhavishya 04 September 2025: खर्च वाढू शकतो, विद्यार्थ्यांना यशाची संधी; कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT