Father's Day Special Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Father's Day Special Recipe: तुमचे वडिल कॉफी लव्हर आहेत? मग घरीच बनवा कॉफी केक

यंदाचा फादर्स डे खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी खास कॉफी केक बनऊ शकता.

Puja Bonkile

Father's Day Special Recipe: दरवर्षी 18 जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आईप्रमाणेच वडिलांचेही मुलांच्या जीवात महत्वाचे स्थान असते.

जरी तुमचे वडील तुमच्यावर असलेले प्रेम तुमच्यासमोर व्यक्त करत नसले तरी त्यांना तुमची सर्वात जास्त काळजी असते. आईप्रमाणेच एक दिवस तुम्ही त्यांना देखील स्पेशल फील करून द्यावे या उद्देशाने या फादर्स डे साजरा केला जातो.

आजचा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही घरीच कॉफी केक बनऊ शकता. तुमच्या वडिलांनाही कॉफी प्यायला आवडत असेल तर त्यांच्या साध्याशा कॉफीमध्ये केकची चव घालून त्यांना सरप्राईज देऊ शकता.

  • एगलेस कॉफी केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 कप मैदा

3/4 वाटी दही

1/4 कप पिठी साखर

1 लहान चमचा व्हॅनिला इसेन्स

1 कप मिल्क चॉकलेट

1/3 कप रिफाइंड ऑइल

1 कप अक्रोड

1/2 टीस्पून बेकिंग सोडा

2 टीस्पून बटर

4 टीस्पून कॉफी पावडर

1 टीस्पून बेकिंग पावडर

4 टीस्पून व्हीप्ड क्रीम

चवीनुसार मीठ

अर्धा कप गरम पाणी

1 कप फ्रेश क्रीम

  • एगलेस कॉफी केक बनवण्याची कृती

सर्वात पहिले एका भांड्यात मध्ये दही, साखर आणि बेकिंग सोडा एकत्र करून नीट मिक्स करून बाजूला ठेवावे. एका मोठ्या भांड्यात मैदा घ्यावा. त्यात बेकिंग पावडर, मीठ मिक्स करावे. तीन चमचे कॉफी घ्या आणि ती गरम पाण्यात विरघळवा. दही आणि साखरेच्या मिश्रणात बुडबुडे उठू लागले की तेव्हा त्यात कॉफी आणि गरम पाण्याचे मिश्रण घाला. तसेच व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब टाका. आता हे दही-कॉफी मिश्रण मैदा आणि मीठ असलेल्या भांड्यात टाका. आणि गुठळ्या न होता चांगले फेटून घ्या. नंतर या पिठात रिफाइंड तेल घाला. खूप घट्ट, पातळ बॅटर तयार होईपर्यंत चांगले फेटून घ्या.

बेकिंग टिन बटरच्या मदतीने ग्रीस करा. त्यात बॅटर घाला आणि सेट करा. वरून बारीक चिरलेले आवडते ड्रायफ्रुट्स आणि अक्रोड घालावे. आता ते 180 डिग्री तापमानात सुमारे 30 मिनिटे बेक करावे. नंतर बाहेर काढा आणि थंड होऊ द्या.

आयसिंग बनवण्यासाठी फ्रेश व्हिप क्रीममध्ये विरघळलेली कॉफी घालावी. पिठीसाखर घालून चांगले फेटून घ्या. पाईपिंग बॅगमध्ये घाला आणि काही आयसिंग बाहेर ठेवा. बेक केलेला केक दोन थरांमध्ये कापून आयसिंग करा आणि चॉकलेट पावडर, चॉकलेट क्रंचने सजवा. तुमचा टेस्टी कॉफी केक तयार आहे.

  • फादर्स डे चा इतिहास

19 जून 1910 रोजी अमेरिकेत राहणाऱ्या सोनोरा स्मार्ट डॉड नावाच्या महिलेने आपल्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी पहिल्यांदाच फादर्स डे साजरा केला. सोनोराचे वडील विल्यम्स स्मार्ट यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर 6 मुलांचे संगोपन केले. तिला तिच्या वडिलांच्या समर्पण आणि बलिदानाबद्दल सन्मानित करायचे होते, म्हणून फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT