Leather Dress Styling Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Leather Dress Styling Tips: लेदर ड्रेसमध्ये सेलिब्रिटी लूक हवा असेल तर 'या' चुका टाळा

Leather Dress Styling Tips: तुम्ही लेदर ड्रेस घालण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसू शकता.

Puja Bonkile

Leather Dress Styling Tips: गुलाबी थंडीत पार्ट्यांसाठी लेदर ड्रेस वापरणे हा सर्वोत्तम पर्याय असतो. तुम्ही ते ड्रेस व्यवस्थित कॅरी केल्यास खूप स्टायलिश दिसू शकता. हे ड्रेस कॅरी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही सर्वांचे लक्ष वेधू शकता.

लेदर ड्रेस निवडताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या

  • लेदर ड्रेसमध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. कार्यक्रमानुसार तुम्ही फिट किंवा फ्लेअर, शॉर्ट किंवा लाँग ड्रेसेसचा पर्याय निवडू शकता. पण तुम्हाला लेदर ड्रेसमध्ये स्टायलिश दिसायचे असेल तर तुमच्या शरीराचा प्रकारही लक्षात ठेवला पाहिजे. याशिवाय, जर तुम्ही स्लिम-ट्रिम असाल, तर उत्तम प्रकारे फिट असलेला ड्रेस निवडावा, तर फ्लेर्ड ड्रेसेस कर्व्ही फिगरवर चांगले दिसतात. फॉर्मल इव्हेंटमध्ये तो परिधान करण्याचा विचार करत असाल तर लाँग लेदर ड्रेस चांगला दिसतो.

  • लेदर सूट ब्लॅक जॅकेट आणि पँट अधिक चांगले दिसते. जर तुम्ही ड्रेस घेण्याचा विचार करत असाल तर त्यात टॅन, न्यूड, मरून आणि ग्रीन शेड्स अधिक चांगले दिसतात.

  • लेदर ड्रेसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी योग्य लेयरिंग देखील खूप महत्वाचे आहे. लेयरिंगसाठी पर्याय निवडताना कार्यक्रम, ठिकाण आणि तापमान लक्षात ठेवावे. जर ते खूप थंड असेल तर लेदर ड्रेससह ट्रेंच कोट घालता येतो. फॉर्मल इव्हेंट्ससाठी लाइट ब्लेझर किंवा कार्डिगन सर्वोत्तम असेल.

  • जास्त मेहनत न करता लेदर ड्रेसमध्ये स्टायलिश लूक हवा असेल तर त्याची फिटिंग योग्य असणे सर्वात महत्त्वाचे आहे. असा ड्रेस निवडा ज्याला वारंवार फिक्सिंगची आवश्यकता नाही किंवा तो इतका घट्ट नसावा की तुम्हाल त्यात श्वास घेता येणार नाही.

  • लेदर ड्रेसमध्ये परफेक्ट लूकसाठी खूप ॲक्सेसरीज घालू नका. या ड्रेससाठी एक पातळ चेन किंवा स्टड कानातले पुरेसे आहेत. स्ट्रॅपी हील्स किंवा एंकल बूट्स यासारखे फुटवेअर्स घालू शकता.

  • लेदर ड्रेस कॅरी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. या ड्रेसमधला आत्मविश्वास आणि अॅटीट्युड तुमचा लुक अधिक स्टायलिश बनवते. तुमचा लूक सर्वांचे लक्ष वेधेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: जीआयएस आधारित कृती आराखड्यासाठी समिती

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

Mopa Taxi Parking Rate: ..अन्‍यथा कुटुंबांसहित आंदोलन करु! टॅक्‍सीचालक संतप्त; मोपावरील वाढीव पार्किंग शुल्क मागे घेण्याची मागणी

Assagao Land Scam: SIT ने फास आवळला! आसगाव जमीन फसवणूक प्रकरणी 795 पानांचे आरोपपत्र सादर

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT