Diwali Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali: दिवाळीत भेसळयुक्त मिठाईपासून राहा सावध, अन्यथा...

दिवाळीत मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते. या दिवसांमध्ये खवा आणि भेसळयुक्त मिठाई बाजारात विकली जाते.

Puja Bonkile

Diwali Health Care Tips: देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करायला सुरूवात झाला आहे. या उत्सहात घरे सजवण्यापासून माता लक्ष्मीचा पूजा करणे, एकमेकांना मिठाई खाऊ घालण्यापर्यंतची तयारी मोठ्या आनंदात केली जाते. 

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकांना मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू देतात. यामुळे मार्केटमध्ये मिठाईची मागणी वाढली आहे. त्याची भरपाई करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी काही लोक बनावट आणि केमिकलयुक्त मिठाई विकतात. 

तुम्हीही बाजारातून मिठाई खरेदी करत असाल तर काळजी घ्यावी. चुकूनही भेसळयुक्त मिठाई खाल्ल्याने तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

दिवाळी निमित्ताने मिठाई बनवण्यासाठी खव्याची मागणी वाढते. ते खूप महाग आहे. अशावेळी काही लोक बाजारात बनावट खवा आणतात. दुधाऐवजी ते बटाटा, आयोडीन, सिंथेटिक दूध, युरिया, डिटर्जंट अशा अनेक घातक रसायनांचा वापर करून बनावट खवा बनवतात. मिठाई सजवण्यासाठी सिल्व्हर वर्क ऐवजी अॅल्युमिनियम वर्क वापरले जाते. हे खूप धोकादायक आहे. अशी मिठाई खाल्ल्याने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी फक्त घरी बनवलेले पदार्थच खावे. बाहेरून मिठाई किंवा खवा घेत असाल तर नीट तपासुन घ्यावे.  

सणासुदीच्या काळात बाजारात मिळणारे नकली दूध, खवा, छेना हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या गोडाचे सेवन केल्याने मेंदूच्या कर्करोगापासून रक्ताचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, मधुमेह, किडनीचे आजार आणि अॅलर्जीपर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते आणि एखाद्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते. 

काही ठिकाणी मिठाईत भेसळ करताना त्यात स्टार्च आणि अनसॅच्युरेटेड फॅटसारख्या गोष्टी मिसळल्या जातात. हे खाल्ल्याने वाईट कॉलेस्टेरॉल वाढते. त्यामुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. हे तरुण आणि वृद्ध लोकांपेक्षा मुलांसाठी अधिक हानिकारक आहे.  बाजारात मिळणाऱ्या मिठाई किंवा खव्यात भेसळ आढळून आल्यास त्याची तक्रार तुम्ही अन्न विभागाकडे करू शकता. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT