Homemade Facial Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Homemade Facial: पार्लरमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा 'या' गोष्टींनी घरीच करा फेशियल

Facial With Kitchen Ingredients: पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरीच फेशियल करू शकता. यासाठी पुढील पद्धतींचा वापर करू शकता.

Puja Bonkile

How To Do Homemade Facial for Glowing Skin

अनेक महिला चमकदार त्वचेसाठी पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारचे फेशिअल करतात. पण त्याचा परिणाम चेहऱ्यावर काही दिवसच दिसून येतो. यानंतर चेहरा पूर्वीसारखा होतो. तुम्ही योग्य घरगुती उपाय करून करून कमी खर्चात चेहऱ्यावर चमक आणू शकता.

बदलत्या हवामानामुळे त्वचा निस्तेज दिसू लागली. यामुळे पार्लरमध्ये पैसे न खर्च करता घरीच फेशियल करू शकता.

स्क्रब (Scrubber) कसे बनवाल

बीट - अर्धे किसलेले

बेसन - 2 चमचे

दही- 1 चमचा

कोरफड जेल- 1 टीस्पून

व्हिटॅमिन ई कॅप्सूल- 1

स्क्रब (Scrubber) कसे करावे

फेशिअल करताना सर्वात पहिले स्क्रब बनवावा लागेल.

सर्वात पहिले बीट चांगले किसून घ्या.

हे चेहऱ्यावर लावून मसाज करा.

त्यानंतर टॉवेलने चेहरा स्वच्छ करा.

यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल

फेसपॅक (Facepack) कसे बनवावे

तुम्ही फक्त बीट वापरून फेस पॅक बनवू शकता.

यासाठी एका भांड्यात बीटचा रस घ्यावा.

त्यात बेसन आणि दही मिक्स करावे.

मग तुम्हाला ते चेहऱ्यावर लावावे लागेल.

काही वेळ कोरडे राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवावा.

यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होईल.

फेस क्रीम (Face Cream) कसे बनवावे

एका भांड्यात बीटचा रस घ्यावा.

नंतर त्यात कोरफड जेल मिक्स करावे.

यानंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करावे.

नंतर ते मिक्स करून चेहऱ्यावर लावावे.

तुमचा चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT