Face Bleaching Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Face Bleaching Tips: केमिकलयुक्त नाही तर घरगुती पदार्थांनी करा ब्लीच

Face Bleaching Tips: तुमचा चेहरा ब्लीच करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या या स्वस्त आणि प्रभावी गोष्टी देखील वापरू शकता.

Puja Bonkile

Face Bleaching Tips: जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक हवी असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेकअपची किंवा कोणत्याही प्रोडक्टची गरज नाही. पण आजकाल लोकांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर पाहिजे तशी चमक येत नाही. 

अशावेळी अनेक सौंदर्य उपचार आणि उत्पादने यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात. मात्र, यामध्ये रसायने वापरली जातात आणि ती खूप महागही असतात. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ब्लीचचा वापर करून तुमचा चेहरा चमकदार आणि ग्लोइंग बनवू शकता, परंतु त्यात रसायने देखील असतात आणि ब्लीच प्रत्येकाच्या त्वचेला सुट होईल असे नाही. तुम्ही घरगुती गोष्टी वापरून ब्लीच करू शकता.यामुळे त्वचा खराब होणार नाही.

मध

साहित्य

  • 1 चमचे मध

  • अर्धा चमचा हळद

मधामध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करावी. हा घरगुती उपाय तुम्ही रोज केल्यास तुमच्या त्वचेचा रंग सुधारेल. मध त्वचा चमकदार करण्यास मदत करू शकते. तसेच चेहऱ्यावर वाढणारे केस काढू शकत नाही.

बटाटा

साहित्य 

  • 1 बटाटा किसलेला 

  • 1 टीस्पून दही 

पद्धत 

बटाटे किसून दह्यात मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवा. जर तुम्ही हा घरगुती उपाय नियमितपणे केला तर तुम्हाला लवकरच त्वचेवर त्याचा प्रभाव दिसू लागेल. 

लिंबू

साहित्य

  • 1 टीस्पून किसलेले पनीर

  • 1 चमचा लिंबाचा रस

पद्धत

पनीर किसून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा. फक्त 2 ते 5 मिनिटे चेहरा स्क्रब केल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. जर तुम्ही हे रोज केले तर तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसून येतील. पनीर आणि लिंबू या दोन्हीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत आणि कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे एक अतिशय चांगले नैसर्गिक त्वचा ब्लीचिंग उपचार असू शकते.

दही

साहित्य

  • 1 टेबलस्पून दही

  • 1 टीस्पून ओट्स पावडर

पद्धत

दही आणि ओट्स मिक्स करून चेहरावर स्क्रब करावे. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे तुमचा चेहरा ब्लीच होईल आणि स्क्रबही होईल. ज्या लोकांची त्वचा कोरडी असते त्यांनी यामदध्ये मध मिक्स करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT