EV Car Battery Care Tips: Dainik gomantak
लाइफस्टाइल

EV Car Battery Care Tips: इलेक्ट्रीक कारच्या बॅटरीची 'अशी' काळजी घेतल्यास लागणार नाही आग

जर तुम्हीही इलेक्ट्रीक कार वापरत असाल तर बॅटरीची कशी काळजी घ्याल हे जाणून घ्या.

Puja Bonkile

EV Car Battery Care Tips follow these tips avoid ev car battery fire

जर तुम्ही घरी इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पण अनेकवेळा या कारच्या बॅटरीमध्ये आग लागल्याची भीती असते. हे कमी करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

इव्ही चार्ज करताना काणती काळजी घ्यावी

इव्हीमध्ये आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॅटरी पॅक जास्त गरम होणे आहे. त्यामुळे चार्जिंग करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे, त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

ईव्ही बॅटरी फक्त 80% पर्यंत चार्ज करावी. कारण जेव्हा बॅटरी जास्त चार्ज होते तेव्हा ती खूप गरम होते, म्हणून प्रत्येक वेळी ती पूर्णपणे चार्ज करणे टाळा. जेणेकरून ते जास्त गरम होणार नाही आणि आग लागण्याची शक्यताही कमी आहे.

तसेच, बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देऊ नका. ती सुमारे 20 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर चार्ज करावी. जेणेकरून ती चांगला प्रतिसाद देईल आणि जास्त काळ टिकेल.

तुमची ईव्ही फक्त रात्री चार्ज करावी. जेणेकरुन कमी बाहेरील तापमानामुळे, इव्हीचा बॅटरी पॅक जास्त गरम होण्यापासून संरक्षित आहे.

तुमची ईव्ही नेहमी सावलीत पार्क करावी. यामुळे बाहेरील तापमान कारच्या बॅटरी पॅकमध्ये आधीच असलेली उष्णता वाढवण्यास मदत करणार नाही.

एकसारखा वेग ठेऊ नका

वाहन चालवताना इव्हीचा वेग वारंवार कमी जास्त केल्याने किंवा एकसारखी स्पीड ठेवल्याने बॅटरीवर लोड येतो. त्यामुळे बॅटरी गरम होऊन आग लागण्याची शक्यता असते. हे टाळले पाहिजे इव्ही एकाच स्पीडमध्ये ठेऊ नका.

वेळेवर सर्विसिंग करणे

तुम्ही एखादे नवी इलेक्ट्रीक कार खरेदी करणार असाल किंवा आधीच एखादी इलेक्ट्रीक कार असेल, मग ती दुचाकी असो किंवा चारचाकी, तुमच्या इव्हीची योग्य सर्विसिंग करून घ्यावी. जेणेकरून त्यात काही अंतर्गत समस्या असल्यास ती वेळीच पकडून दुरुस्त करता येईल. कारण अनेक लोक छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आग लागू शकते.

या काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला तसेच तुमचे इलेक्ट्रिक वाहन सुरक्षित ठेवू शकता. यानंतरही इव्हीमध्ये काही अडचण आल्यास लगेच जवळच्या सेवा केंद्रात घेऊन जा, अजिबात उशीर करू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT