5 दिवसांसाठी गोवा प्रवास: ऑक्टोबर-नोव्हेंबर हा गोवा पर्यटन हंगामाचा सर्वोत्तम काळ मानला जातो. या हंगामात जास्त सूर्यप्रकाश किंवा जास्त पाऊस नसतो. यावेळी गोव्याचं आल्हाददायक हवामान आणि ताजी हवा प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते. जर तुम्हाला कमी वेळेत आणि स्वस्तात गोव्याचे सौंदर्य पाहायचे असेल तर उत्तर गोव्याच्या दिशेने जा. त्यासाठी सुट्ट्यांचे योग्य प्रकारे नियोजन करा. जर तुम्ही अद्याप गोव्याला गेला नसाल आणि या वेळी तुम्ही सुट्टी समुद्रकिनारी घालवण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.
दिवस पहिला- गोवा सहलीच्या पहिल्या दिवशी अंजुना बीचचा आनंद घ्या. येथील लुना रेस्टॉरंट इटालियन खाद्यपदार्थांसाठी खूप प्रसिद्ध आहे. व्हिस्की असो किंवा आयरिश कॉफी, इथे सर्व काही मस्त आहे. आपण येथे नाश्ता, दुपारचे जेवण आणि स्नॅक्सचा आस्वाद घेऊ शकता. या बीचवर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही फिरायला जाऊ शकता. येथूल समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ दिसतो, जर तुम्ही बीचवर गेल्यानंतर लाटांमध्ये खेळायचा विचार केला असेल तर तुमच्या रिसॉर्टमध्ये परत आल्यावर नक्कीच आंघोळ करा. सूर्यास्ताच्या वेळी ा ठिकाणी नृत्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही पर्पल मार्टिनीलाही जाऊ शकता.
दुसरा दिवस - सहलीच्या दुसऱ्या दिवशी , तुम्ही वागातोर बीचवर जाऊ शकता. येथील बाबका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करा. येथील मिठाई आणि कॉफी खूप प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त, आपण येथे थंडा काढा आणि दालचिनी रोल ट्राय करू शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही लंचसाठी बीन मी अप रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. वागातोर बीच वरून सॅनसेटचे दृश्य खूप सुंदर दिसते. फोटो काढण्यासाठीही गोव्यातील हे सर्वोत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडत असतील तर इथे गनपाऊडर रेस्टॉरंटला नक्की भेट द्या.
तिसरा दिवस- तिसऱ्या दिवशी तुम्ही मोरजीला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. हे ठिकाण बंगाली जेवणासाठी प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त, आपण येथे निकोइज सॅलड, व्हेजिटेबल क्रंबल आणि अंडी खावू शकता. पीच आइस्ड चहा ही इथली खासियत आहे. मोर्झिम बीचवर तुम्हाला दिवसा खूप छान वाटेल. तुम्ही इथे डुबकीही मारू शकता, म्हणून पूर्ण तयारीने येथे जा. जर तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळी पिझ्झा, सीफूड आणि टेस्टी नूडल्सच्या आनंद घ्यायचा असेल तर टोमॅटो बीचसाइड किचन अँड बारला नक्की भेट द्या.
चौथा दिवस - सहलीच्या चौथ्या दिवशी तुम्ही कांदोळी / शिवोली बीचवर जावू शकता. नाश्त्यासाठी तुम्ही बाबा आणि रहम रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. तिथे घरी बनवलेली कॉफी, सँडविच, क्रोयसंट्स, बॅगुएट्स आणि बर्गर बरेच प्रसिद्ध आहेत. या बिचवर आपण बिनधास्त खेळू शकता. मात्र या बीचवर जाताना जास्तीचे कपडे सोबत घ्यायला विसरू नका. तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बर्गर फॅक्टरी येथे जाऊ शकता.
पाचवा दिवस- तुम्ही पाचवा दिवस गोव्यात पणजीत घालवू शकता. येथे तुम्हाला सांस्कृतिक दृश्यापासून ते प्रसिद्ध कॅफेपर्यंत पर्यटनाचा आनंद घेण्याची संधी मिळेल. तुम्हाला गोवा हवेलीमध्ये एक कला प्रदर्शन पाहायला मिळेल. यानंतर, तुम्ही ब्रेसेरीला भेट देऊन सीफूड आणि अल्कोहोलीक प्येयाचा आनंद घेऊ शकता. संध्याकाळी इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चजवळ फिरताना आश्चर्यकारक दृश्याचा आनंद घेता येतो. जर तुम्हाला चांगले फोटो काढायचे असतील तर संध्याकाळी या ठिकाणी नक्की भेट द्या. मात्र सहलीचे नियोजन करताना, लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगण्यास विसरू नका आणि मास्क कुठेही काढू नका.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.