Vegetables For Piles Problem  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vegetables For Piles Problem: 'या' पाच भाज्या मुळव्याधाची समस्या करतील दूर, आजर करा आहारात समावेश

मूळव्याधच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून काही भाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

Puja Bonkile

Vegetables For Piles Problem: मूळव्याध ही एक समस्या आहे जी रुग्णाला खूप त्रास देते. मूळव्याधच्या बाबतीत रुग्णाला गुदद्वाराच्या आत आणि बाहेर मस्से तयार होतात. ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचाल करताना जळजळ आणि वेदना होतात. इतकंच नाही तर कधी-कधी जास्त जोर लावला तर रक्तस्त्रावही होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला चालणे, उठणे-बसणेही कठीण होते. 

मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बद्धकोष्ठता आणि योग्य प्रमाणात पाणी न पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मसालेदार आणि जंक फूडचे अतिसेवन ही त्याची सर्वात मोठी कारणे आहेत.

जेव्हा बद्धकोष्ठता तीव्र होते तेव्हा ते मूळव्याधचे रूप घेते. त्यावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. मूळव्याधांवर ताबडतोब उपचार करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण जर ते गंभीर झाले तर त्यामुळे फिस्टुला आणि फिशर सारखे वेदनादायक रोग होऊ शकतात. मूळव्याधच्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून आहारात पुढील भाज्यात आहारात समावेश करू शकता.

कोबी

कोबी कुटुंबातील भाज्या मूळव्याधात खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये ब्रोकोली, फ्लॉवर, यासारख्या भाज्यांचा समावेश होतो. NIH च्या अहवालानुसार, या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अघुलनशील फायबर असते आणि 1 कप (76 ग्रॅम) कच्च्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर असते. फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते.

तुमच्या आहारात सिमला मिरचीचा समावेश करा

जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश जरूर करा. आम्ही तुम्हाला सांगतो की 92 ग्रॅम चिरलेल्या सिमला मिरचीच्या एका कपमध्ये सुमारे 2 ग्रॅम फायबर आढळते आणि या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाणही जास्त असते. 

गाजर, बीट सारख्या फळभाज्या 

मुळा, बीट, गाजर, रताळे आणि बटाटे या भाज्या जमीनीखाली येतात. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. विरघळणारे फायबर तुमच्या आतड्यांमधले चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते आणि मल सहज निघून जाण्यास मदत करते. 

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक असतात. ते पचनास मदत करतात. मुळव्याधपासून आराम मिळवण्यासाठी पचनक्रिया मजबूत करणे आवश्यक आहे. पालक, ब्रोकोली, स्प्राउट्स, गाजर, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, कांदा, काकडी अशा काही भाज्यांचा आहारात समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT