Cloths Hacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wardrobe: वॉर्डरोब नीट करण्यासाठी वापरा 'या' पाच सोप्या टिप्स

वॉर्डरोब नीट ठेवण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी फॉलो करू शकता.

Puja Bonkile

easy tips for organize wardrobe read full story

वॉर्डरोबमधून कपडे काढताना अनेकदा अडचणी येतात. अनेकदा आपण जे कपडे शोधतो ते दिसत नाही. यासाठी वॉर्डरोबमध्ये कपडे नीट ठेवणे गरजेचे असते.

कपड्यांचे प्रकार

तुमचे कपडे वेगवेगळ्या प्रकारे क्रमवारी लावा. जसे की टी-शर्ट, जीन्स, शर्ट आणि स्कर्ट वेगळे ठेवा. याच्या मदतीने तुम्हाला जेव्हाही काही घालायचे असेल तेव्हा ते तुम्हाला सहज सापडेल.


रंगांनुसार कपडे ठेवावे

एकदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ठेवले की, रंगांनुसार त्यांची मांडणी करा. जसे सर्व लाल कपडे एकत्र आणि पांढरे कपडे वेगळे. याच्या मदतीने जेव्हा तुम्हाला विशिष्ट रंगाचा शर्ट किंवा पँट लागेल तेव्हा लगेच मिळेल.

हँगर्स वापरचा वापर

शर्ट, जॅकेट आणि ड्रेससारखे कपडे हँगर्सवर लटकवा. यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडणार नाहीत आणि तुम्हाला ते सहज सापडतील.याशिवाय हँगर्सवर कपडे ठेवल्याने वॉर्डरोबमधील जागाही वाचते.


ड्रॉर्स आणि कपाटांचा योग्य वापर

अंडरगारमेंट्स, सॉक्स आणि बेल्टसारखे छोटे कपडे ड्रॉअरमध्ये ठेवा. गोष्टी आणखी व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही ड्रॉवरच्या आत डिव्हायडर वापरू शकता.

वातावरणानुसार कपडे वेगळे ठेवा

जे कपडे ऋतूनुसार परिधान केले जात नाहीत ते इतर ठिकाणी ठेवा. जे तुम्हाला घालायचे नाहीत ते दुसऱ्या ठिकाणी ठेवा. हे तुमच्या वॉर्डरोबमध्ये अधिक जागा वाचवेल आणि तुमचे दैनंदिन परिधान केलेले कपडे शोधणे सोपे करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT