Bath Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Skin Bath Tips: कोरडी त्वचा असणाऱ्यांनी आंघोळीच्या पाण्यात मिक्स करावी

Dry Skin Bath Tips: तुम्हाला त्वचा चमकदार हवी असेल तर आंघोळीच्या पाण्यात पुढील गोष्टी मिक्स करू शकता.

Puja Bonkile

dry skin tips special bath ingredients for dry skin read how to use

बदलत्या वातावरणात त्वचा कोरडीही होते. जर तुम्ही या समस्येवर उपाय शोधत असाल तर खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करू शकता.

हे सर्व पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत. तुम्हाला मार्केटमध्ये अनेक बॉडी लोशन मिळतील, पण नैसर्गिक गोष्टींनी त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे फायदे तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन प्रॉडक्ट्समधून मिळणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊया हे पदार्थ कोणते आहेत.

गुलाब जल

आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा गुलाबजल टाकावे आणि या पाण्याने आंघोळ करावी. गुलाब जल नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय असू शकतो. रोज पाण्यात गुलाबजल टाकून अंघोळ केली तर शरीरात जो काही कोरडेपणा आहे तो कमी होतो.

मध

मध हे त्वचेसाठी खूप चांगले नैसर्गिक मॉइश्चरायझर देखील आहे. आंघोळीच्या पाण्यात 2 चमचे मध मिक्स केल्यास शरीरातील सर्व कोरडेपणा कमी होतो. मधामध्ये ब्लीचिंग गुणधर्म देखील असतात. दररोज मधाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा उजळते. तुमच्या त्वचेत कोणताही संसर्ग झाला असला तरीही तुम्ही मधाच्या पाण्याने आंघोळ करू शकता, कारण ते दाहक-विरोधी आहे.

नारळ पाणी

तुम्ही आंघोळीच्या पाण्यात नारळाचे पाणी मिक्स करू शकता. या पाण्याने रोज आंघोळ केल्यास त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन त्वचा चमकदार होम्यास मदत मिळते. नारळ पाणी अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी आहे. तुमच्या शरीरात कुठेही सूज किंवा संसर्ग होत असेल तर या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरेल.

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठीही खूप चांगले असते. तुम्ही ते थेट त्वचेवर वापरू शकता. जर तुमची त्वचा मिश्रित असेल तर आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा ऑलिव्ह ऑईल टाकावे. अशा पाण्याने तुम्ही दररोज आंघोळ करू शकता. या पाण्याने आंघोळ केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बॉडी लोशन लावू नका.

बदाम तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर असते. हे तेल एक चमचा पाण्यात टाकून आंघोळ करावी. बदामाचे तेल केवळ तुमची त्वचा चमकत नाही. त्वचेचा कोरडेपणाही निघून जातो. बदामाचे तेलही तुमची त्वचा घट्ट करते आणि चेहऱ्यावरील डाग कमी करते.

दूध

दुधामध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. तुमच्या त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करते. दुधामध्ये कोलेजन असते, यामुळे तुमची त्वचा तरुण राहते आणि ती घट्टही होते. ब्लीचिंग गुणधर्मामुळे त्वचेचा टोनही बदलतो. पाण्यात दूध मिक्स करून आंघोळ केल्याने त्वचा मुलायम होते आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT