Drinking Water Standing Effects | Drinking Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हाला पण उभं राहून पाणी प्यायची सवय आहे? मग जाणून घ्या हे तोटे

Drinking Water Benefits : उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते.

Kavya Powar

पाणी आपल्या शरीरसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण पाणी उभे राहून प्यायल्याने त्याचे अनेक तोटे होऊ शकतात. जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर त्याचे काय नुकसान आहे? जर तुम्ही बसून पित असाल तर त्याचे काय फायदे आहेत? हे आपण जाणून घेऊयात. (Drinking Water Standing Effects; Drinking Water Benefits)

तहान भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.

पचनाला कठीण

उभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

किडनीचे आजार

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.

शरीरातील आम्ल पदार्थांचे प्रमाण कमी होत नाही

आयुर्वेदामध्ये नमूद केल्याप्रमाणे पाणी उभ्याने आणि घाईघाईमध्ये पिऊ नये. पाणी शांतपणे बसून प्यावे. असे केल्यास शरीरामधील आम्लाच्या (अॅसिडच्या) प्रमाणात समतोल राखला जातो. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही. या उलट बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.

जळजळीचा त्रास

उभ्याने पाणी प्यायलेले ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात करते. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्थायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो. तसेच पाणी पोटात वेगाने येत असल्याने आम्लाची हलचाल वेगावल्याने अॅसिडीटीचा त्रास होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बागा बीचवर 'मिल्की ब्युटी'चा धमाका! तमन्नाच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सनं लावलं वेड; गोव्याच्या समुद्रकिनारी रंगली न्यू इयर पार्टी

'पाश्चात्य देशांनी लसींचा साठा केला, पण भारतानं जग वाचवलं!', कोविड लसीकरणावरुन जयशंकर यांची IIT मद्रासमध्ये तूफान फटकेबाजी VIDEO

New Kia Seltos Launch: क्रेटाचं टेन्शन वाढलं! किआ सेल्टोस नव्या अवतारात लाँच; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Usman Khawaja Retirement: "मी पाकिस्तानी- मुस्लिम म्हणूनच मला..."; निवृत्तीच्या वेळी ख्वाजाचे गंभीर आरोप Watch Video

Masorde: सफर गोव्याची! रानवनांनी - नद्यांनी वेढलेले, औषधी पाण्याचा प्रवाह असणारे 'मासोर्डे'

SCROLL FOR NEXT