महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झालीय. भक्तांनी आपल्या घरांत आणि सोसायट्यांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केलीय. आता पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहेत. गणपती बाप्पांला (Ganpati Bappa) लाल आणि पिवळा रंग प्रिय आहे. या उत्सवकाळात जेव्हा आपण गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण करतो. तसेच कोणत्या गोष्टी अर्पण करू नये याबद्दल सुद्धा माहिती असायला हवे. चला तर मग जाणून घेवूया गणपती बाप्पांला (Ganpati Bappa) कोणती फुले (Flowers) अर्पण करावी आणि कोणती करू नये.
* केतकीचे फुले (Basil)
गणपती बाप्पांला केतकीची फुले अर्पण केली जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार, केतकी फुले महादेवाला अप्रिय होते म्हणून गणपती बाप्पाला सुद्धा ही फुले अर्पित केली जात नाही.
* तुळस
शास्त्र आणि पुराणात असे म्हंटले आहे की न तुलस्य गणाधिपम. याचा असरठ असा की तुलस गणपतीला अर्पित करू नये. एकदा तुळशीने गणपतीला लंबोदर म्हणून लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा गणेशजीनी तुळशीला शाप दिला होता आणि तेव्हापासून तुळस बाप्पांना अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.
* वाळलेली किंवा सोकून गेलेली फुले (Dried flowers)
गणपती बाप्पांची पूजा करताना त्यांना वाळलेली किंवा सोकून गेलेली फुले अर्पित करू नये. गणपती बाप्पांला सोकलेली फुले वाहने अशुभ मानले जाते. यामुळे घरात दारिद्र्य येवू शकते.
* जास्वंदाचे फूल (Hibiscus flower)
जास्वंदचे लाल आणि पिवळे फूल गणपती बाप्पांला प्रिय आहे. ही फुले अर्पण केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात.
* झेंडूचे फूल (Marigold flowers)
मुख्यत: झेंडूचे फूल गणपती बाप्पांला अर्पण केली जातात. तसेच या फुलांचा हार सुद्धा अर्पित केला जातो. गणपती बाप्पाला झेंडूचे फूल प्रिय आहे. हे फूल अर्पण केल्यास तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.