Throat Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Throat Cancer: अति गरम चहा-कॉफी प्यायल्याने खरंच घशाचा कॅन्सर होतो का? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने घसा किंवा अन्ननलिकेला दुखापत होते ज्याला 'ओसोफेजल म्यूकोसा' म्हणतात.

Kavya Powar

Throat Cancer: जर तुम्हाला गरम चहा प्यायला खूप आवडत असेल, तर ही बातमी वाचून तुम्ही नक्कीच टेन्शनमध्ये याल. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने घसा किंवा अन्ननलिकेला दुखापत होते ज्याला 'ओसोफेजल म्यूकोसा' म्हणतात.

त्यामुळे 'ओसोफेजल कॅन्सर' होण्याचा धोका असू शकतो. नोएडा येथील 'शारदा हॉस्पिटल'चे एमडी डॉ. श्रेय श्रीवास्तव यांच्या मते, केवळ गरम चहा आणि कॉफीमुळे घशाचा कर्करोग होण्याची शक्यता नसते. उलट घशाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र गरम चहा हे देखील एक कारण असू शकते.

'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' द्वारे प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की अनेक आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेला अशी धोकादायक इजा होऊ शकते.

अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रकार म्हणजे oesophageal squamous cell carcinoma (ESCC) आणि esophageal adenocarcinoma (EAC) आहेत. केवळ गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो याचा कोणताही पुरावा नाही. तज्ञांच्या मते तंबाखू, दारू, सुपारी, स्मोक्ड मीट, अयोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच पर्यावरण प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

तुम्ही फक्त गरम चहा प्यायल्याने घशाच्या कर्करोगाचा धोका होतो असे असू शकत नाही. पण हे देखील खरे आहे की जे लोक तंबाखू किंवा मद्यपान करतात त्यांच्यासाठी गरम चहा पिल्याने कर्करोगाचा धोका दुप्पट होतो.

घशाच्या कर्करोगाची लक्षणे

  • अन्न गिळण्यात अडचण (डिसफॅगिया)

  • वजन कमी होणे

  • छातीत दुखणे, जळजळ

  • अपचन

  • खोकला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: कठुआमध्ये भारतीय जवानांचा थरार! जैश-ए-मोहम्मदच्या 'उस्मान'चा खात्मा; पाकड्यांचा मोठा कट उधळला

Tourist Taxi Fire: पर्वरीत टुरिस्ट टॅक्सीनं घेतला पेट! पोलिस अन् स्थानिकांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Tridashanka Yoga 2026: 26 जानेवारीला आकाशात मोठा चमत्कार! बुध-अरुणचा 'त्रिदशांक योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; सोमवार ठरणार भाग्याचा

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

SCROLL FOR NEXT