Document Security Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Document Security Tips: 'हे' अ‍ॅप मोबाइलमधील महत्वाची डॉक्यूमेंट्स ठेवतील सुरक्षित

जर तुम्ही मोबाइलमध्ये अनेक महत्त्वाची डॉक्यूमेंट्स ठेवत असाल तर सुरक्षित आहे की नाही हे तपासावे.

Puja Bonkile

Document Security Tips: जर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये तुमची अनेक महत्त्वाची डॉक्यूमेंट ठेवत असाल तर तुम्ही ती मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवावीत. कारण जर तुम्ही तुमची डॉक्यूमेंट मोबाइलमध्ये सुरक्षितपणे ठेवली नाहीत, तर तुमच्या डॉक्यूमेंट्समधील डेटाही लीक होऊ शकतो. जर तुम्हाला तुमची सर्व डॉक्यूमेंट तुमच्या मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवायची असेल तर पुढील अ‍ॅपची मदत घेऊ शकता.

  • फोल्डर लॉक

फोल्डर लॉक अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे महत्त्वाचे डॉक्यूमेंट तुमच्या मोबाइलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरवरही सुरक्षित ठेवू शकता. यासाठी, तुम्हाला सर्वात पहिले ते डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा पासवर्ड सेट करावा लागेल. त्यानंतर डॉक्यूमेंटमध्ये असलेला तुमचा डेटा सुरक्षित राहील. हे अ‍ॅप अँड्रॉइड यूजर्स तसेच iOS युजर्स वापरू शकतात. हा एक प्रकारचा क्लाउड सेव्हिंग आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा सहज वापर करू शकता आणि त्यात अनेक डॉक्यूमेंट सेव्ह करू शकता.

  • डीजीलॉकर

हे एक प्रकारचे सरकारी अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्ही तुमची अनेक डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवू शकता. यासाठी, आधी तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरसह या अ‍ॅपमध्ये साइन अप करावे लागेल. यानंतर, तुम्हाला जी डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवायची आहेत, ती तुम्ही या अ‍ॅपमध्ये क्लाउड सेव्ह करू शकता. यामध्ये तुम्ही अनेक फीचर्सचा लाभ देखील घेऊ शकता. यामुळे तुमचे डॉक्यूमेंट्स सुरक्षित राहतील.

  • फाइल लॉकर

तुम्ही हे अ‍ॅप तुमच्या फोनमधील प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या अ‍ॅपमध्ये सेव्ह करावे लागतील. यानंतर तुम्हाला यामध्ये तीन सुरक्षा पर्याय मिळतील. डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फिंगरप्रिंट, कोड किंवा इतर कोणतेही पासवर्ड सेट करू शकता. यामुळे तुमचे डॉक्यूमेंट एकाच ठिकाणी सुरक्षित राहतील आणि तुम्हाला कोणत्याही एका डॉक्यूमेंटसाठी दुसरे कोणतेही अ‍ॅप घ्यावे लागणार नाही. कारण ते पीडीएफ आणि वर्ड या दोन्ही स्वरूपात कागदपत्रांना सपोर्ट करते. तसेच सेव्हदेखील करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

MS Dhoni Viral Video: सिगारेटचं पाकीट धोनीचं की साक्षीचं? सलमानच्या पार्टीदरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी 'माही'ला धरलं धारेवर

पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद घेऊनच परतणार; अग्निकांड आणि ZP निवडणुकीनंतर CM सावंतांनी गाठली दिल्ली

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT