Mangosteen
Mangosteen 
लाइफस्टाइल

भारतातील या दुर्मिळ फळांनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

दैनिक गोमंतक

Rare Fruit In India: फळे (Fruit) खाणे आरोग्यासाठी लाभदायक असतात. आपण डाळिंब, केळी, सफरचंद,  चिकू असे अनेक फळ दररोज खाण्यात येतात. पण अशी काही फळ आहेत जी लोकप्रिय नाही. अशी फळे साधारणता: उष्णकटीबंधीय भागात घेतली जातात. अशी फळे त्या भागामध्ये अतिशय सामान्य आहे. परंतु ते फळ प्रत्येक भागात खाल्लीच जातात असे नाही. परंतु अशी फळे पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतात. त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अशा फळांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Do you know about this rare fruit in India?)

1) चाकोटारा: हे फळ लिंबूसारखेच असते. हे फळ पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळ या भागात आढळतात. हे फळ पौष्टिक आणि व्हिटॅमिन सी असलेला चांगला स्रोत आहे. या फळामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण भरपूर असते. हे आपल्या वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यासाठी  मदत करते. हे फळ हृदय निरोगी ठेवण्यात मदत करते. 

2) स्टार फळ -  स्टार फळ  भारतात आढळणारे हे पिवळे फळ आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. या फळामध्ये लिंबाच्या रसात असणारे आम्ल भरपूर प्रमाणात आहे. यामध्ये अनेक पोषक द्रव्य तसेच व्हिटॅमिन सी चे प्रमाण देखील असते. या फळामुळे कर्करोगासारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. 

3) काफल - हे फळ चवीला गोड आणि आंबट आहे. मेघालयामध्ये एप्रिल ते जुलै या काळात हे फळ मिळते.याफळामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-हेल्मिंथिक, अँटी-मायक्रोबियल, 
अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे  गॅस, बद्धकोष्ठता यासरख्या पोटा  संबंधित आजारांपासून बरे होण्यास मदत करते.

4) जपानी पर्सिम्मन फ्रूट - हे फळ हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि नीलगिरी हिल्समध्ये  आढळणारे  गोड फळ आहे. हे केशरी रंगाचे फळ आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे. या फळामुळे  हृदयरोग, फुफ्फुसांचा कर्करोग, यासारख्या अनेक आजरांचा धोका कमी होण्यास मदत होते.

5) मॅंगोस्टीन - हे फळ मूळचे दक्षिण-पूर्व आशियामधील आहे. हे फळ जगभरातील विविध उष्णदेशीय प्रदेशांमध्ये आढळते. या फळामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे. तसेच फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारख्या अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश आहे. कर्करोग, लठ्ठपणा आणि मधुमेह या आजारांविरूद्ध लढण्यास मदत करते.

6) खिरणी फळ - खिरणी हे फळ चवीला  गोड असते. हे पिवळ्या रंगाचे  असते. जे फळ उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळुन येते.  या फळाची लागवड उन्हाळ्यात होते. या फळाचा आनंद आपण मे महिन्यात घेऊ शकतो. खिरणीचे फळ आरोग्यसाठी फायदेशीर  आहे. या फलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यासोबतच ताप आणि कावीळ हे आजार बरे करते.

7) बेल- बेल या फळाचे तापमान थंड असते. त्यामुळे आपण हे फळ ताजे किंवा वाळलेले घेऊन खाऊ शकतो. यामध्ये फायबर, फॉस्फरस, प्रथिने आणि लोह असे पोषक घटक असतात. हे फळ आतडे आणि पाचणक्रिया सुलभ  ठेवण्यास मदत करते. तसेच हे फळ आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT