Yoga For Digestion Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga For Digestion: पचनक्रिया निरोगी ठेवायची असेल तर 'ही' योगासने ठरतील फायदेशीर

पोटासंबंधित आजार दूर ठेवायचे अशेल तर तुम्ही पुढील योगासने केले पाहिजे.

Puja Bonkile

do these yoga for good digestion watch photo

आजकालच्या खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि योगाचा अभाव यामुळे लोकांना पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जास्त तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड, धूम्रपान या सवयींचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

त्यामुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. तुम्हाला जर पचनसंस्था आणि पोटासंबंधित समस्या कमी करायच्या असेल तर पुढील योग प्रकार करू शकता.

वज्रासन

पोटा संबंधित असलेले आजार किंवा समस्या दूर करण्यासाठी वज्रासन खूप प्रभावी आहे. यासाठी पाय गुडघ्यापासून मागे वाकवून बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. यानंतर दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा आणि काही मिनिटे याच स्थितीत राहा आणि दीर्घ श्वास घ्या.

vajrasana

विपरिता करणी

यासाठी भिंतीजवळ झोपा आणि नंतर त्याच भिंतीचा आधार घेऊन दोन्ही पाय वरच्या बाजूला घेऊन सरळ ठेवावे. लक्षात ठेवा की तुमचे पाय आणि पृष्ठभाग यांच्यामध्ये 90 अंशांचा कोन असावा. यासाठी किमान पाच ते पंधरा मिनिटे या पोझमध्ये रहावे. असे केल्याने शरीरातील घाण सहज निघून जाते आणि ऊर्जा वाढते.

Viparita Karani

पदहस्तासन

हा योगा करताना सरळ उभे राहावे आणि नंतर श्वास घेताना हात वरच्या दिशेने घ्या, यानंतर श्वास सोडताना किंचित मागे वाकावे. यानंतर, पुन्हा एकदा तुम्हाला पुढे वाकून दीर्घ श्वास घ्यावा लागेल, पुढे वाकून हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. पाय सरळ ठेवताना शक्य तितके वाकवा. जर तुम्हाला तुमच्या मणक्यामध्ये काही समस्या असेल किंवा गुडघ्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर हे आसन करण्यापूर्वी आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या.

Padahastasana

पश्चिमोत्तानासन

हा योग प्रकार करण्यासाठी पाय समोर पसरून बसावे आणि आता पुढे वाकून दोन्ही हातांनी पायाच्या बोटांना स्पर्श करावा. तसेच तुमचे डोके तुमच्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करावा. याशिवाय ही संपूर्ण प्रक्रिया किमान पाच वेळा करा.

Paschimottanasana

वरील योग प्रकरा करण्यापुर्वी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT