Mobile Charging  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tech Tips: मोबाईल चार्ज करताना 'या' पाच चुका करू नका

तुमच्या मोबाईल चार्जिंगच्या पुढील सवयींमुळे तुमचा मोबाइल आणि बॅटरी दोघांचेही नुकसान होत आहे.

Puja Bonkile

Tech Tips: आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे फास्ट चार्जर देखील आहे. पण तरीही प्रत्येकाला चार्जिंगची चिंता आहे. तुमच्या मोबाईल चार्जिंगच्या काही सवयींमुळे तुमचा मोबाइल आणि बॅटरी दोघांचेही नुकसान होत आहे. पुढील काही नियमांचे पालन करून तुम्ही बॅटरी आणि मोबाइल दोन्ही दीर्घकाळ वापरू शकता.

ओरिजनल चार्जर वापरा

नेहमी तुमच्या फोनशी सुसंगत असा ओरिजनल चार्जर वापरावे. बाजारातून कोणताही चार्जर विकत घेऊन त्याचा वापर करणे धोकादायक ठरू शकते.

जास्तीत जास्त चार्जिंग टाळा

तुमच्या मोबाईलचे जास्तीत जास्त चार्जिंग टाळावे. म्हणजे फक्त 80-90% पर्यंत चार्ज करा.

फास्ट चार्जिंग टाळा

फास्ट चार्जिंग बॅटरीचे आयुष्य नष्ट करते. तुम्ही 20 वॅट्सपर्यंतचा चार्जर वापरू शकता.

उष्णता टाळा

मोबाईल गरम ठिकाणी किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. कारण जास्त उष्णतेमुळे बॅटरी फुगते आणि खराब देखील होऊ शकते.

चार्जिंग केबलची काळजी घ्या

नेहमी ओरिजनल असलेली किंवा फोनसोबत येणारी चार्जिंग केबल वापरावी. 

बेडवर ठेवू नका

मोबाईलला सोफा किंवा बेडवर चार्ज करायला ठेऊ नका. कारण त्यामुळे उष्णता निर्माण होऊ शकते. जी बॅटरीसाठी चांगली नाही.

रात्रभर चार्जिंग टाळा

मोबाईल रात्रभर चार्ज करणे टाळावे. कारण त्यामुळे बॅटरी जास्त चार्ज होऊन उष्णता निर्माण होऊ शकते. यामुळे मोबाइल गरम होऊन फूटू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT