Liver Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Liver Symptoms: यकृतावर सूज येण्याची दोन प्रमुख लक्षणे कोणती? ती कशी ओळखायची? जाणून घ्या

Liver Inflammation: यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यकृतच आपल्या संपूर्ण शरीराचे मॅनेजमेंट करते. यकृताचे मुख्य कार्य आपल्या शरीरात असलेल्या हानिकारक पदार्थांना डिटॉक्सिफाय करणे आहे, जेणेकरुन पचनसंस्था सुरळीतपणे चालू राहते.

Manish Jadhav

यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यकृतच आपल्या संपूर्ण शरीराचे मॅनेजमेंट करते. शरीरात असलेल्या हानिकारक पदार्थांना डिटॉक्सिफाय करणे हे यकृताचे मुख्य कार्य आहे, ज्यामुळे पचनसंस्था सुरळीतपणे चालते. मात्र यकृताला सूज आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यकृताला सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. यकृताला आलेल्या सूजेला वैद्यकीय भाषेत हेपॅटायटीस म्हणतात. चला तर मग यकृताला सूज आल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? याविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...

यकृताला सूज

यकृताला सूज येणे ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे संपूर्ण शरीराच्या गतीविधींवर देखील परिणाम होऊ शकतो. तुम्ही यकृताची सूज ही एक चिंताजनक स्थिती मानू शकता. जर तुम्हाला वेळेवर यकृताला सूज आल्याचे समजले नाहीतर त्याचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. यकृताची सूज कमी होईपर्यंत उपचारादरम्यान काही समस्या देखील निर्माण होऊ शकतात. जेव्हा यकृताला सूज येते तेव्हा सुरुवातीला दोन मुख्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार सुरु करावेत.

ही लक्षणे आहेत

जर यकृताला सूज आल्याचे समजल्यास त्यावर तात्काळ उपचार सुरु करावेत. मात्र जर ते उशिरा समजले तर उपचार कठीण होऊन बसते. यकृताला सूज येण्याची लक्षणे सुरुवातीला खूपच सौम्य असतात. जेव्हा यकृताला सूज येते तेव्हा सुरुवातीची लक्षणे म्हणजे डोळे पिवळे होणे आणि पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होणे. जेव्हा लक्षणे तीव्र होतात तेव्हा वेदना वाढतात आणि त्वचेचा रंग देखील पिवळा होऊ लागतो. याशिवाय, यकृताला सूज आल्यावर थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवतो. तसेच, भूक देखील कमी होते. यासोबतच, मल आणि लघवीचा रंग बदलून अधिक गडद होतो. मळमळ आणि घोट्यांमध्ये सूज येणे ही देखील यकृताच्या सूजेची लक्षणे आहेत.

डॉक्टरांना तात्काळ भेटा

जर तुम्हाला डोळे पिवळे वाटत असतील आणि पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी. सुरुवातीला त्यावर सहज उपचार करता येतात. डॉक्टर अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन तुमचे मागवू शकतात. याशिवाय, रक्त तपासणीद्वारेही यकृताची स्थिती जाणून घेता येते. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा हे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT