Kitchen Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Kitchen Tips: भारतीय किचनसाठी सर्वोत्तम चिमणी कोणती आहे?

स्वयंपाकघरातील गरम हवा कमी करण्यासाठी, चिमणी लावली जाते.

Puja Bonkile

Kitchen Tip for Best Chimney in India: स्वयंपाकघरातील गरम हवा कमी करण्यासाठी, चिमणी लावली जाते.

चिमणीशिवाय स्वयंपाकघरात काम करणे महिलांना अवघड होते. कारण स्वयंपाक करताना निर्माण होणारी वाफ चिमणीतून बाहेर पडते.

त्यामुळे स्वयंपाकघरात गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण होत नाही. म्हणूनच आता स्वयंपाकघरात चिमणी असणे सामान्य झाले आहे.

पण, भारतीय स्वयंपाकघरात डक्टेड चिमणी किंवा डक्टलेस चिमणी लावायची की नाही हे अजूनही अनेकांना माहीत नाही.

या माहिती अभावी अनेक वेळा लोक त्यांच्या स्वयंपाकघरात चुकीची चिमणी बसवतात. यामुळे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या महिलांना नंतर त्रास सहन करावा लागतो.

खर तर चुकीच्या चिमणीतून वाफ आणि धूर बाहेर पडत नाही आणि स्वयंपाकघरात गुदमरल्यासारखे वाटते.

म्हणूनच भारतीय स्वयंपाकघरात कोणती चिमणी लावावी हे जाणून घेऊया.

  • भारतीय स्वयंपाकघरासाठी कोणती चिमणी सर्वोत्तम आहे?

तुम्ही तुमच्या घरात अन्न शिजवताना पाहिले असेल. बहुतेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तेल आणि तूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

भाज्या आणि कडधान्यांचा अधिक वापर केला जातो. युरोपियन स्वयंपाकघरापेक्षा भारतीय स्वयंपाकघरात जास्त मसालेदार आणि ठसकेदार पदार्थ बनवले जातात.

जर तुम्ही डक्ट असलेली चिमणी बसवली तर त्यातून धूर निघण्यास अडचण येते. त्यामध्ये, जर तुम्ही विना डक्टवाली चिमणी वापरली तर सहजपणे धूर बाहेर निघून जाईल.

  • डक्टवाली चिमणी कशी काम करते?

डक्ट केलेल्या चिमणीत वाफ आणि धूर काढण्यासाठी एक डक्ट दिले जाते. या चिमण्या अशा ठिकाणी बसवल्या जातात, जिथे चिमणी पाईप बाहेर काढायला जागा नसते.

डक्ट केलेल्या चिमणीतून धूर बाहेर काढण्यात खूप त्रास होतो. म्हणूनच भारतीय स्वयंपाकघरात ते यशस्वी होऊ शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT