Diwali Vasubaras Rangoli Designs Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Vasubaras Rangoli Designs : वसुबारससाठी सुंदर रांगोळी डिझाईन्स; एकदा नक्की ट्राय करा

Diwali Rangoli Designs : हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते.

दैनिक गोमन्तक

हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

(Diwali Vasubaras Rangoli Designs)

वसुबारससाठी जर तुम्ही रांगोळीच्या डिझाईन शोधत असाल तर खाली दिलेल्या डिझाईन तुम्ही नक्की वापरू शकता.

Diwali Vasubaras Rangoli Designs

खरे तर वसु बारस याचा साधा आणि सरळ सरळ अर्थ म्हणजे धनांची बारस.

Diwali Vasubaras Rangoli Designs

या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखले जाते.

Diwali Vasubaras Rangoli Designs

या दिवशी संध्याकाळी गाई आणि पाडसाची पूजा घरामध्ये धनधान्य, संपत्ती आणि लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी केली जाते. 

Diwali Vasubaras Rangoli Designs

गाय, बैल, म्हैस या मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी गाय-बैलांना न्हाऊ-माखू घालून छान सजवले जाते आणि मग त्यांचे औक्षण करून गोडधोड खायला दिले जाते.

Diwali Vasubaras Rangoli Designs

ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.

Diwali Vasubaras Rangoli Designs

घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले,अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.

Diwali Vasubaras Rangoli Designs

निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.

Diwali Vasubaras Rangoli Designs

आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

Diwali Vasubaras Rangoli Designs

या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे.

Diwali Vasubaras Rangoli Designs

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT