Diwali Vastu Tips:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Vastu Tips: दिवाळीपूर्वी घराला रंग देण्याचा विचार करताय? मग वास्तुनुसार निवडा परफेक्ट रंग

तुम्हालाही यंदा दिवाळीत घराला रंग द्यायचा असेल तर वास्तुमध्ये सांगितलेले नियम फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Diwali Vastu Tips: दिव्याचा सण म्हणजे दिवाळी. हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला खूप महत्त्व आहे. या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परतले होते. या दिवसासाठी, लोक त्यांच्या घरात सजावट करण्यास सुरवात करतात. दिवाळीपूर्वी लोक घरांना रंग देतात. वास्तूनुसार आपल्या घरांमध्ये कोणता रंग लावावा हे जाणून घेऊया. जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावर राहील.

घराला रंग देताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. जर तुम्हाला घराच्या भिंतींसाठी रंग निवडायचा असेल तर असा रंग लावावा ज्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि शांती येईल. यामुळे जर तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींसाठी लाइट रंगांची निवड करावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही. तसेच डार्क रंग घराच्या भिंतींवर लावल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ शकतात.

दिवाळीच्या निमित्ताने तुमच्या भिंती रंगवण्याचा विचार करत असाल तर पांढरा, लाइट पिवळा, लाइट केशरी, निळा, हलका गुलाबी असे हलके रंग वापरू शकता.

लाल रंग

लाल रंग हा माता लक्ष्मीचा आवडता रंग आहे. या रंगाचा वापर लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये खूप केला जातो. माता लक्ष्मीची पूजा करताना भाविक या रंगाचे कपडे घालतात. माता लक्ष्मीला लाल फुले अर्पण करतात. परंतु घराला लाल रंग लावत नाही.

पिवळा रंग

वास्तुनुसार घराच्या पुर्व दिशेला पिवळा रंग द्यावा. पण जास्त डार्क पिवळा रंग वापरू नका. पिवळा रंगाचा स्वामी हा बृहस्पति आहे. हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतिक आहे. म्हणूनच पिवळ्या रंगाचा लाभ मिळण्यासाठी उत्तर -पुर्व दिशेला लावावा. या दिशेला हा रंग लावल्यास सुख-समृद्धी लाभते.

त्यामुळे, जर तुम्हालाही दिवाळीपूर्वी तुमच्या घराच्या भिंतींचा रंग बदलायचा असेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर दिवाळीला हे रंग निवडल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: घरात लगीनघाई सुरु असतानाच आला हार्ट अटॅक! स्मृती मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता; पाहुणे परतले

VIDEO: गजराजाची स्टाईल! 'भाऊ टोपी घाल' म्हटल्यावर हत्तीनं घातली... सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय Viral! तुम्ही पाहिला का?

चक दे इंडिया! टीम इंडियाच्या लेकींनी इतिहास रचला, नेपाळचा पराभव करत जिंकला विश्वचषक Watch Video

Goa Live News: साळगाव पोलिसांची मोठी कारवाई! 85 हजारांचे गांजासह आरोपीला रंगेहाथ अटक

Pooja Naik: "नोकरी घोटाळ्यावर बोलणार पण..." पूजा नाईकच्या आरोपांवर मंत्री सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केली बाजू

SCROLL FOR NEXT