दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक सण आहे. यावर्षी 24 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशीसह दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. वास्तविक दीपावली हा सण पाच दिवस चालणारा असतो. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, तिसऱ्या दिवशी दिवाळी, चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या मंगल सणानिमित्त आपल्या प्रियजणांना हटके अंदाजात शुभेच्छा द्या. त्यासाठी खाली दिलेल्या दिवाळी विशेष शुभेच्छा नक्की वाचा.
(Diwali 2022 Wishes in Marathi Status)
धन त्रयोदशी !!
नरक चतुर्दशी !!
लक्ष्मी पूजन !!
बलि प्रतिपदा !!
भाऊबीज !!
आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय होवो…
शुभ दीपावली!
अश्विनची नवी सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ नवा विश्वास,
दीपावलीची हीच तर खरी सुरवात,
म्हणूनच या दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा..
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली!
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
ही दिवाळी आनंद दायी , सुख समृध्दिची जाओ.
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला..
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला..
आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Diwali!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.