Diwali Decoration Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diwali Decoration Tips: दिवाळीत घर सजवताना करू नका 'ही' चूक, माता लक्ष्मी होईल नाराज

चला तर मग जाणून घेऊया दिवाळीची सजावट करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

Puja Bonkile

Diwali Decoration Tips: दिव्याच्या सण म्हणजे दिवाळी. धनत्रयोदशीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते. यंदा १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली जाते. वास्तुनुसार घराची सजावट करतांना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. कारण नकळतपणे आपण अशा चुका करतो ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीची सजावट करतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

या वस्तु घरात ठेऊ नका

दिवाळीत घराची स्वच्छता केली जाते आणि सजावटीची खास काळजी घेतली जाते. दिवाळीपूर्वी घरातून तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू काढून टाकाव्या. जर आरसा तुटलेला असेल तर तो बदलून घ्यावा. अशा वस्तू घरात राहिल्याने घरातील वास्तुदोष खराब होऊ लागतात आणि माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. तसेच, हे लक्षात ठेवा की घराच्या छतावर रद्दी किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका कारण यामुळे आर्थिक संकट वाढू शकतात.

अशा मुर्ती घरी आणु नका

दिवाळीत घर सजवण्यासाठी फोटो किंवा मूर्ती आणल्यास काही गोष्टी लक्षात ठेवायला पहिजे. तांडव करणाऱ्या नटराजाची मूर्ती, महाभारताचा फोटो, बुडत्या जहाजाचे फोटो, ताजमहालचा फोटो, वन्य प्राण्यांचे फोटो इत्यादी हिंसक आणि नकारात्मक फोटो किंवा मूर्ती घरात कधीही लावू नका. असे केल्याने घरातील वास्तू खराब होते आणि आर्थिक प्रगती होत नाही..

तोरण लावतांना काळजी घ्यावी

दारावर तोरण बांधणे दिवाळीत अत्यंत शुभ मानले जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवलेले तोरण घराचे सौंदर्य वाढवतात. पण तोरण बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तोरणामध्ये कोरडी पाने आणि फुले नसावीत, मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी ताजी फुले लावावी, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मीची कायम कृपा राहते.

घराचा रंग असा असावा

दिवाळीच्या दिवशी घराला रंग देतात. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरही सुंदर दिसते. मुख्य गेटजवळच्या खोलीचा रंग नेहमी पांढरा, लाइट हिरवा किंवा गुलाबी असावा. लिव्हिंग रूममध्ये पिवळा, तपकिरी, हिरवा रंग द्यावा. जेवणाच्या खोलीत हिरवा, निळा, लाइट गुलाबी रंग वापरावा. गुलाबी, हिरवा किंवा निळा रंग बेडरूमसाठी योग्य असेल आणि काळा, निळा किंवा हिरवा रंग मुलांच्या खोलीसाठी शुभ असेल.

घरात कोणत्या रंगाची लाइटिंग करावी

दिवाळीत घर सजवण्यासाठी रंगीबेरंगी लाइटिंगने सजावट केली जाते. दिशेनुसार रंगीबेरंगी लाइटिंग वापरल्यास ते अधिक शुभ राहील. घराच्या पूर्व दिशेला लाल, पिवळा, केशरी लाइंटिंग निवडावी. पश्चिम दिशेसाठी पिवळा, गुलाबी, केशरी रंग वापरावा. उत्तर दिशेसाठी निळे, पिवळे आणि हिरवे लाइटिंग लावावी. दक्षिण दिशेसाठी पांढरा, जांभळा, लाल रंग निवडावा.

या वस्तु वापरू नका

घराच्या सजावटीसाठी तीक्ष्ण वस्तू वापरू नका.

तसेच काचेशी संबंधित तीक्ष्ण वस्तूंचा वापर टाळावा.

या गोष्टी घरातील वास्तू खराब करतात आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो.

याशिवाय राहूचा अशुभ प्रभावही राहतो कारण आरसा हा राहूशी संबंधित मानला जातो.

त्यामुळे घराच्या सजावटीमध्ये धारदार आणि काचेशी संबंधित गोष्टींचा वापर टाळावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT