Distraction Dainik GOmantak
लाइफस्टाइल

Overcome Distraction: काम करताना लक्ष लागत नाही? मग या 5 गोष्टी कराच

तुमचेही काम करतांना लक्ष विचलित होत असेल तर या टिप्स तुमच्या कामात येईल.

Puja Bonkile

How to Overcome Distractions: बिझी शेड्युलमुळे या जीवनात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो.

9 ते 6 ऑफिस, अवेळी जेवण, खराब लाइफस्टाइल आपले लक्ष विचलित होते. याशिवाय इतर अनेक कारणे कारणीभूत आहेत.

काम काही वेगळे आणि आपले लक्ष दुसरीकडेच राहते. विद्यार्थ्यांपासून ते काम करणाऱ्या लोकांपर्यंत सर्वच लोक डिस्टॅक्शनला बळी पडतात.

तुमच्यासोबतही असे घडते का की काम करतानाही तुमचे लक्ष विचलित होते. पुढिल या टिप्स तुम्हाला नक्की मदत करेल.

  • डिस्टॅक्शनसोबत कसे डिल करावे

कामाचे नियोजन करावे

डिस्टॅक्शन कमी करण्यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी एक दिवस अगोदर सर्व नियोजन करावे. जेणेकरून काम कसे करावे या विचारात तुमचा संपूर्ण दिवस जात नाही.

सोशल मीडियापासून दूर राहावे

मोबाईल फोन आणि सोशल मीडियापासून अंतर ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. काहीवेळा सोशल मीडियावरून स्क्रोल केल्याने तुमचे लक्ष डिस्टॅक होते आणि तुमचे कामावरील लक्ष कमी होते.

ईमेल तपासण्यापूर्वी, फोन कॉल करण्याआधी किंवा सोशल मीडिया फीड वाचण्याआधी कार्य पूर्ण करण्याचे ध्येय ठेवावे, असे केल्याने तुम्ही कोणतेही काम डिस्टॅक न होता वेळेवर पूर्ण करू शकाल.

ध्यान लावावे

ध्यान केल्याने लक्ष केद्रिंत करण्यास मदत मिळते. ध्यान केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते. मनात येणारे विचार सोडून एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो. यामुळे चिंता, तणाव, नैराश्य यासारखे कोणतेही मानसिक अस्वस्थता राहत नाही.

पुरेशी झोप

7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. जर तुमची झोप कमी झाली तर तुम्हाला लक्ष केंद्रित करणे देखील अवघड होते.

पुरेशी झोप झाल्यास आराम मिळतो. ही एक प्रकारची उपचार प्रक्रिया आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. झोपेच्या कमतरतेमुळे कामाचा वेग कमी होतो आणि दिवसभर कामात आळशीपण वाटतो.

मल्टीटास्कींग टाळावे

एकाच वेळी अनेक काम करणे टाळावे. एकावेळी एक गोष्ट केल्याने तुम्हाला महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते आणि तुमच्या कामाची प्रोडक्टिव्हिटी देखील चांगली राहते.

असे केल्याने तुम्ही तुमचे ध्येय आरामात साध्य करू शकता. जर तुम्ही वारंवार एका कामामधून दुसऱ्या कामाकडे जात असाल तर तुम्ही कोणतेही काम नीट करू शकणार नाही.

ब्रेक घ्यावा

कामाच्या करतांना थोडा वेळ ब्रेक घ्यावा. यामुळे डिस्टॅक्शनपासून दूर राहाल.जर तुम्ही सतत काम करत राहिलात तर तुम्हाला जास्त थकवा जाणवेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकणार नाही. ब्रेक न घेता काम केल्याने फोकस कमी होते. यामुळे नियमितपणे ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT