Monsoon Skin Care: पावसाळ्यात सुरू झाला असून देशभरात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे लोक अजूनही त्रस्त आहेत. पाऊस सर्वांनाच आवडतो पण दिवस-रात्र मुसळधार पाऊस त्रासदायक ठरतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात त्वचेसंबंधित अनेक समस्या वाढतात. यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात वातावरणात आद्रर्ता कमी असल्यामुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे या दिवसांमध्ये चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढते. या पावसाळ्यात देखील तुम्हाला जर त्वचा पूर्णपणे फ्रेश आणि चमकदार असावी असे वाटत असेल तर तुम्हाला काही देशी टिप्स फॉलो कराव्या लागतील. पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया.
पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
1) पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात पहिले तुमचा चेहरा स्वच्छ ठेवावा. बाहेरून आल्यावर चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. दिवसातून दोनदा चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला ओलावा मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही निम फेस वॉश, ग्रीन टी फेस वॉश आणि टी ट्री फेस वॉश वापरू शकता.
2) पावसाळ्यात चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही गुलाब जल देखील वापरू शकता. गुलाब जलने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. गुलाबजलचा वापर टोनर म्हणूनही केरता येतो. पावसाळ्यात चेहऱ्यावर कोणतेही क्रीम न लावता गुलाबजल वापरावे.
3) पावसाळ्यात त्वच तेलकट होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर डस्टिंग पावडर वापरावे. असे न केल्यास त्वचेवर जास्त तेल येत असल्याने त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.
पावसाळ्यात 'हे' पॅक वापरावे
मुलतानी माती आणि गुलाबजल
तुम्ही मुलतानी मातीमध्ये गुलाबजल मिक्स करावे आणि त्वचेवर लावावे. यासाठी दोन चमचे मुलतानी माती घ्यावी. त्यात गरजेनुसार गुलाबजल टाकावे. चांगले मिश्रण तयार करावे. चेहरा स्वच्छ करून हा पॅक लावावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक लावल्याने चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.
मुलतानी माती आणि दही
चिकट आणि तेलकट त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करून लावू शकता. त्यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो. मुलतानी माती आणि दह्याचे मिश्रण लावल्याने त्वचा एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्याची चमकही वाढते. तुम्ही दोन चमचे मुलतानी मातीमध्ये दही मिक्स करू शकता. चेहरा आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर पॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
पावसाळ्यात चेहऱ्यावर चिकटपणा आल्याने पिंपल्स होण्याचा धोकाही असतो. यामुळे मुलतानी मातीमध्ये चंदन पावडर मिसळून लावावे. यामुळे चिकटपणा दूर होऊ शकतो. एक चमचा चंदन पावडर एक चमचा मुलतानी मातीत मिक्स करावे. त्यात थोडे पाणी टाकावे किंवा गुलाबपाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्याने त्वचेवरील चिकटपणा दूर होतो. हे मुरुम आणि मुरुमांपासून देखील संरक्षण करते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.