Dry fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diet To Boost Immunity: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्हिटॅमीन ठरतील उपयुक्त

Diet To Boost Immunity: ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.

दैनिक गोमन्तक

आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. बहुतांशवेळा आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन सी चे जास्त प्रमाण असलेले फळे, भाज्या यांचा समावेश आपल्या आहारात करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र व्हिटॅमिन सी शिवायदेखील असे अनेक पोषक घटक आहेत ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते. व्हायरल आजारांना आपण लगेच बळी पडण्याची शक्यतादेखील कमी होते.

व्हिटॅमिन डी

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक पेशी सक्रिय करण्यास मदत करते. शरीरातील यव्हिटॅमिन डी कमतरता भरून काढण्यासाठी कोवळ्या उन्हात काही वेळ उभे राहणे महत्वाचे ठरते. याशिवाय दूध, संत्री, दही इत्यादींचा आहारात समावेश करू शकतो. ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.

व्हिटॅमिन-ए

शरीरात व्हिटॅमिन-एच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. व्हिटॅमिन-ए ज्यामुळे तुम्ही अनेक आजारशी लढू शकता. व्हिटॅमिन-ए शरीराला मिळण्यासाठी गाजर, रताळे आणि पालक सारखे पदार्थ खाऊ शकतो. यामध्ये फळभाज्यामध्ये व्हिटॅमिन-ए पुरेशा प्रमाणात आढळते.

झिंक

झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. शरीरातील झिंक या पोषक तत्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी. बिया, धान्यापासून बनवलेले पदार्थ आणि मांस यांसारखे पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवू शकतो. ज्यामुळे शरीरातील झिंकची कमतरता दूर होते.

व्हिटॅमिन- ई

व्हिटॅमिन-ई एक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. महत्वाचे म्हणजे, रोगप्रतिकारक पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन-ई समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यासाठी बदाम, ब्रोकोली, एवोकॅडो इत्यादी गोष्टी खाल्ल्या जाऊ शकतात.

सेलेनियम

सेलेनियम हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषक आहे. सेलेनियम शरीरात एन्झाईम्स उत्पन्न करण्यास मदत करते. शरीरातील सेलेनियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, धान्यापासून बनवलेले पदार्थ, अक्रोड या सेलेनियम-समृद्ध पदार्थांमध्ये समावेश करु शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT