Back Dimples
Back Dimples  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कंबरेवरतीही असतात 2 डिंपल्स; तुम्हाला माहित आहे का कारण?

दैनिक गोमन्तक

मानवी शरीर थोडं विचित्र आहे, आपल्याला स्वतःच्या शरीराशी संबंधित अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती नसते, ज्या गोष्टी आपण वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. शरीराबद्दलची एक मुख्य गोष्ट म्हणजे अशी की प्रत्येक माणसाचं शरीर सारखं नसतं. प्रत्येकाच्या शरीराची निसर्गाने जन्मापासूनच वेगवेगळी रचना केली आहे. अशीच एक गोष्ट म्हणचे आपल्या पाठीच्या खालच्या भागात असते. काही लोकांच्या पाठीच्या खालच्या बाजूला दोन डिंपल तयार होतात, हे तुमच्या कधी लक्षात आलं का? (Did you know that there are 2 dimples on the waist?)

अनेकांच्या कंबरेवर अश्या प्रकारचे डिंपल्स असतात, ते गालावर असणाऱ्या डिंपलसारखे म्हणजे गालांवर पडते त्या खळीसारखेचं दिसतात. परंतु कंबरेवर हे डिंपल असण्याचं कारण काय आहे आणि त्याला काय म्हणतात, हे फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला डिंपल्स (Dimple) कंबरेवर का होतात हे सांगणार आहोत. या डिंपलला डिंपल्स ऑफ व्हीनस किंवा व्हीनस होल (Venus Hole) असं म्हणतात. रोममध्ये शुक्राला सौंदर्याची देवता मानलं जातं आणि ज्या महिलांना हे डिंपल्स असतात त्यांना सुंदर आणि भाग्यवान मानलं जातं, असंही एक कारण या डिंपल्समागे प्रचलित आहे.

बॅक डिंपल्स म्हणजे काय?

व्हीनस होल हे बहुतेक स्त्रियांच्या कंबरेवर असतात, परंतु कधीकधी ते पुरुषांच्या शरीरावरदेखील आढळून येतात. जिथे पेल्विस आणि पाठीचा कणा एकत्र येतो, त्या ठिकाणी हे डिंपल्स तयार होतात. या ठिकाणी त्वचा आणि पाठीचा कणा जोडलेला असतो. आश्चर्याची एक गोष्ट अशी आहे की कंबरेवर डिंपल व्यायामामुळे येत नाहीत, त्यामुळे तुम्ही ते स्वतःहून निर्माणही करू शकत नाही. जर तुमचं वजन कमी झालं तर तुमच्या पाठीचे डिंपल्स सहजच दिसू लागतील.

बॅक डिंपलशी संबंधित काही अफवा

बॅक डिंपलबद्दल (Back dimples) आतापर्यंत अनेक अफवा पसरल्या गेल्या आहेत. ज्यात, बॅक डिंपलमुळे शारीरिक संबंध ठेवताना लोकांना चांगलं वाटतं, ही एक मुख्य अफवा आहे. बॅक डिंपलमुळे व्यक्ती आकर्षक दिसते, हे एक कारण या अफवेमागे आहे. परंतु डिंपल्स आणि शारीरिक संबंध यांचा इतर कोणताही संबंध नाहीये. शिवाय, ज्यांच्या पाठीवरती हे डिंपल्स आहेत ते भाग्यवान असतात, असं देखील म्हटलं जातं. परंतु वरील अफवेप्रमाणेच फक्त डिंपल्समुळे एखादी व्यक्ती भाग्यवान असण्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण किंवा संशोधन नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टी फक्त अफवा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT