Diabetes Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Diabetes Control: मधुमेहींनी नाश्त्यात 'हे' 5 पदार्थ खाणे टाळावे, वाढू शकते ब्लड शुगर

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

Puja Bonkile

Diabetes Control: मधुमेह हा असाध्य आजार आहे. जो केवळ नियंत्रणात ठेवल्यास टाळता येऊ शकतो. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय वाढते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे अनेक पदार्थ आहेत, जे नाश्त्यात खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. 

चहा-कॉफी


अनेकांची दिवसाची सुरुवात नेहमी चहा आणि कॉफीने होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते महाग ठरू शकते. चहा आणि कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. यामुळे त्यांचे सेवन करणे टाळावे.

पॅकेज ज्यूस


दिवसाची सुरुवात ज्यूसने करणे फायदेशीर असते. बरेच लोक पॅकेज केलेले ज्यूस पितात. त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. पॅकेट ज्यूसमध्ये साखर असते जी मधुमेहासाठी धोकादायक असते. यामुळे पॅकेट ज्यूस पिणे टाळावे.

गोड पदार्थ


गोड पदार्थ खाल्ल्याने थेट रक्तातील साखरेवर परिणाम होतो. नाश्त्यात गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. यामुळे सकाळी कोणतीही गोड पदार्थ खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

मैदा खाणे टाळा

मैदा खाणे पाटासाटी चांगले नाही. ते शरीराच्या आत ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रक्तातील साखर वाढू नये म्हणून रिफाइंड पिठाचे पदार्थ खाणे टाळावे.

तळलेले पदार्थ


नाश्त्यात तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. खूप तळलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. चरबी हळूहळू पचते, म्हणून रक्तातील साखर वाढू शकते. यामुळे नाश्त्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT