Vastu Shashtra  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Shashtra : बेडरूमची सजावट 'अशी' करा आणि नात्यामधील तणावाचे प्रसंग टाळा..

घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंचे विशेष असे महत्त्व आहे. घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते. ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो. नात्यात समंजसपणा असेल तर अनेक अडचणींना सहज तोंड देता येते. मात्र, कधीकधी परस्पर समन्वय असूनही, नातेसंबंधात समस्या निर्माण होतात.

नात्यामध्ये वाढलेल्या तणावाचे कारण अनेक वेळा वास्तुदोषही असू शकतात. वास्तुशास्त्रातील नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक आणि शारीरिक समस्या निर्माण होतात. वास्तूनुसार घरात लावलेल्या चित्रांचाही घरातील ऊर्जेवर विशेष प्रभाव पडतो. बेडरूममध्ये कोणतेही पेंटिंग किंवा चित्र ठेवताना विशेष काळजी घ्यावी.

राधा-कृष्णाचा फोटो-

प्रेमाचे प्रतीक मानले जाणारे राधा-कृष्णाचा फोटो बेडरूममध्ये लावणे चांगले मानले जाते. वास्तूनुसार बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र किंवा मूर्ती नैऋत्य दिशेला लावावी. असे केल्याने पती-पत्नीमधील प्रेमही वाढते.

बेडरूममध्ये अशा पेंटिंग लावू नका-

  • वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये युद्धाचे चित्र लावू नये. अशी पेंटिंग घरातील समस्या वाढवण्याचे काम करतात. असे चित्र लावल्याने पती-पत्नीमधील भांडणे वाढतात असे मानले जाते.

  • वास्तूनुसार बेडरूममध्ये अग्नीचा फोटोही लावू नये. आग हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.

  • दिवंगत पूर्वजांचे फोटो देखील बेडरूममध्ये लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये अशी चित्रे पती-पत्नीच्या मनात अशांती निर्माण करतात. ईशान्य कोपऱ्यातील भिंतीवर पूर्वजांची चित्रे लावावीत.

  • बेडरूममध्ये जंगली प्राण्यांची त्यांची पेंटिंग किंवा कोणताही फोटो लावू नका. त्यांच्या प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते. म्हणूनच बेडरूममध्ये अशी चित्रे लावणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT