Dangerous Snakes In Summer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dangerous Snakes In Summer: उन्हाळ्यात 'हे' साप ठरू शकतात जीवघेणे, दिसले तर त्वरित सावध व्हा

Snakes In Summer: उन्हाळा हा सापांच्या हालचालीसाठी अत्यंत अनुकूल ऋतू असतो. उष्णतेमुळे साप सावली आणि थंड जागा शोधत असतात.

Sameer Amunekar

उन्हाळा हा सापांच्या हालचालीसाठी अत्यंत अनुकूल ऋतू असतो. उष्णतेमुळे साप सावली आणि थंड जागा शोधत असतात. त्यामुळेच जंगल, शेती, बाग, घराच्या परिसरात किंवा ओलसर ठिकाणी त्यांचा वावर वाढतो.

उन्हाळ्यात काही साप विशेषतः आक्रमक आणि धोकादायक होतात. अशा सापांच्या विषाची ताकद अधिक असल्याने सर्पदंश हा जीवघेणा ठरू शकतो. उन्हाळ्यात कोणते साप अधिक खतरनाक असतात आणि त्यांच्यापासून कशी काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.

कोब्रा

या सापाच्या अंगावर गोलसर चट्टे किंवा पट्टे असतात. चिडल्यास किंवा धोक्याची जाणीव लगेच हल्ला करतो. ओलसर जागा, शेत, गवताळ प्रदेश, खड्डे आणि झाडांच्या मुळाजवळ हा साप जास्त आढळतो.

मण्यार

हा साप रात्रीच्यावेळी जास्त सक्रिय असतो, त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीला चावण्याची शक्यता जास्त.या सापाच्या अंगावर गडद निळसर किंवा काळ्या रंगाचा, अंगावर शुभ्र पट्टे. या सापाचं विष शरीरात पसरल्यावर बेशुद्ध होण्याची शक्यता. पडीक जमिनी, जुन्या इमारती, लाकडाचे ढीग आणि घराच्या फटीत हा साप जास्त आढळतो.

घोणस

जाडसर शरीर असतं, तपकिरी रंगावर गोलसर डाग या सापाच्या अंगावर असतात. हा साप प्रचंड आक्रमक, चिडल्यास जोरात फुत्कारतो आणि पटकन हल्ला करतो. साप चावल्यावर त्वचेमध्ये सूज, वेदना आणि रक्तस्त्राव सुरू होतो. मोकळी शेतजमीन, ऊस शेती, खडकाळ भाग आणि गवताळ प्रदेश अशा जागी हा साप जास्त आढळतो.

फुरसे

हा साप लहान आकाराचा असतो पण अत्यंत वेगाने हालचाल करणारा असतो. त्वचेच्या घर्षणामुळे "स्स्स्स्स्स्स" असा आवाज करतो. याचं विष अत्यंत वेगाने रक्तात मिसळते, मृत्यूचा धोका जास्त. दगड-गोट्यांखाली, कोरड्या ठिकाणी, शेतात आणि रस्त्याच्या कडेला हा साप जास्त आढळतो.

उन्हाळ्यात साप चावण्याचे प्रमाण का वाढते?

  • उन्हाळ्यात साप सावली आणि थंड जागा शोधतात, त्यामुळे ते घरांच्या आसपास किंवा पाण्याजवळ आढळतात.

  • पावसाळ्याच्या आधी साप अन्नाच्या शोधात अधिक सक्रिय होतात.

  • रात्रीच्या वेळी काही विषारी साप जसे की करैत झोपलेल्या माणसांना चावू शकतात.

  • ग्रामीण भागात शेतकरी, मजूर आणि लाकूडतोड करणाऱ्या लोकांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो.

साप चावल्यास काय करावे?

ताबडतोब रुग्णालयात जा – उशीर केल्यास विष शरीरभर पसरू शकते.
पीडित व्यक्तीला शांत ठेवा – घाबरल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि विष पटकन पसरते.
हालचाल कमी करा – शक्यतो चावलेला अवयव हलवू नका.
चावलेला भाग हृदयाच्या खाली ठेवा – यामुळे विष पसरण्याचा वेग कमी होतो.
जखमेच्या वरच्या भागावर हलका पट्टा बांधा – पण रक्तप्रवाह पूर्णतः बंद होणार नाही याची काळजी घ्या.
रुग्णालयात जाताना चावलेला साप कोणता होता हे लक्षात ठेवा – शक्य असल्यास फोटो काढा.

साप दिसल्यास काय करावे?

  • घाबरून पळू नका किंवा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका.

  • सर्पमित्र किंवा वन विभागाला फोन करून मदतीसाठी बोलवा.

  • घराच्या खिडक्या-दरवाजे बंद ठेवा आणि सापाला घरातून बाहेर जाण्यासाठी वाट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT