Dandruff Treatment
Dandruff Treatment Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dandruff Treatment: फक्त 'हे' 5 सोपे घरगुती उपाय करतील केसांतील कोंडा दुर

दैनिक गोमन्तक

Hair Care Tips: उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या निर्णाम होतात.यामुळे उन्हाळ्यात आरोग्यासह केसांची काळजी घेणे गरजेचे असते. ऋतु कोणताही असो, केसांमध्ये कोंड्याची समस्या या असतातच. अयोग्य आहार, फंगल इन्फेक्शन यामुळे बहुतांश लोक या समस्येने त्रस्त असतात. जर तुम्हालाही कोंड्याची समस्या असेल तर घरगुती उपायांचा वापर करु शकता.

केस स्वच्छ ठेवणे

केसांच्या मुळात चांगली मसाज करुन धुतल्यास केसांतील कोड्यांची समस्या कमी होते. डोक्यातील कोंडा दूर ठेवायचा असेल तर निरोगी केस स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी केटोकोनाझोल किंवा झिंक पायरिथिओन किंवा सेलेनियम सल्फाइड किंवा पिरोक्टोन ओलामाइन असलेले शॅम्पू वापरावे.

ते लावल्यानंतर ते कमीतकमी 5-10 मिनिटे टाळूवर राहू द्या आणि नंतर ते पाण्याने स्वच्छ धुवावे. असे आठवड्यातून 2 ते 3 वेळा असे केल्याने कोंडा कमी होउ शकतो.

  • सकस आहार घ्यावा

फास्ट फूड (FastFood), साखर आणि इतर प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने यीस्टला अधिक चालना मिळते. व्हिटॅमिन बी, झिंक, प्रोबायोटिक्स युक्त आहार (Diet) घेतल्यास कोंडा टाळण्यास मदत होते.

फ्लेक्ससीड्स, अंडी, नट, शेंगा, केळी, फॅटी मासे आणि दही टाळूवरील अतिरिक्त सीबम उत्पादन कमी करण्यास मदत करतात आणि टाळूला ओलावा ठेवण्यास देखील मदत करतात. यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.

  • केसांना तेल लावणे टाळा

तुम्हालाही केसांमधील कोड्याची समस्या असेल तर केसांमध्ये तेल कमी लावावे. केसांमध्ये तेल लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते. त्यामुळे केसांमध्ये तेल लावणे कमी करावे.

  • हेअर स्टाइलिंगचे प्रोडक्टचा वापर कमी करावा

केसांमधील कोंड्यांची समस्या कमी करायची असेल तर बाजारातील हेअर स्टाइलिंगचे प्रोडक्टचा अतिवापर टाळावा. ड्राय शॅम्पू, हेअर स्प्रे आणि इतर स्कॅल्प उत्पादनांसारख्या केसांच्या स्टाइलिंग उत्पादनांमुळे कोंड्याची समस्या वाढु शकते.

स्ट्रेस कमी घ्यावा

जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर कोंड्याच्या समस्येसोबतच केस गळण्याचीही समस्या उद्भवू शकते. स्ट्रेसमुळे शरीराचा बुरशीजन्य संसर्गाचा प्रतिकार कमी होतो आणि ते कोंडाशी लढू शकत नाही. म्हणूनच ताणतणाव दूर ठेवण्यासाठी व्यायाम आणि ध्यान करणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT