Daily Horoscope 10 May Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 10 May : 'या' लोकांना मालामाल होण्याची संधी! इथे करा गुंतवणूक; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 10 May : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. (Daily Horoscope 10 May)

Daily Horoscope 10 May
  • वृषभ :

आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नोकरी बदलणे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे. सध्याची नोकरी सोडून तुम्हाला सूट होणा-या मार्केटींग यांसारख्या क्षेत्रात काम करावे. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

Daily Horoscope 10 May
  • मिथुन :

आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा.

Daily Horoscope 10 May
  • कर्क :

लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात.

Daily Horoscope 10 May
  • सिंह :

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा

Daily Horoscope 10 May
  • कन्या :

कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात.

Daily Horoscope 10 May
  • तुळ :

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा.

Daily Horoscope 10 May
  • वृश्चिक :

जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope 10 May
  • धनु :

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल.

Daily Horoscope 10 May
  • मकर :

प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. स्वत:ला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याचवेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझविणाºया गोष्टींवर थोडा वेळ खर्च करा. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल.

Daily Horoscope 10 May
  • कुंभ :

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.

Daily Horoscope 10 May
  • मीन :

हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Daily Horoscope 10 May

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT