‘Dada’ is an important movement in the field of art and literature Dainik Gomantak
लाइफस्टाइल

कला आणि साहित्याच्या क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘दादा’ एक महत्त्वाची चळवळ

‘दादईजम’च्या ‘रेझन द’येट्र’ ने तत्कालीन सामाजिक नियमांना आव्हान दिले आणि हेतुपूर्वक अशा रचनांना लोकांसमोर मांडले.

दैनिक गोमन्तक

20 व्या शतकाच्या सुरुवातीला कला आणि साहित्याच्या क्षेत्रात खळबळ माजवणारी ‘दादा’ ही महत्त्वाची चळवळ सुरू झाली. ‘दादईजम’च्या ‘रेझन द’येट्र’ ने तत्कालीन सामाजिक नियमांना आव्हान दिले आणि हेतुपूर्वक अशा रचनांना लोकांसमोर मांडले. दर्शक गोंधळून गेले (आणि संतापलेदेखील) झुरीचमधल्या ‘कॅबरे व्हॉल्तेअर’या कलात्मक नाईटक्लबशी संबंधित असलेल्या साऱ्या कलावंतांना आणि साहित्यिकांना ‘दादाईजम’ने प्रेरित केले. (‘Dada’ is an important movement in the field of art and literature)

पणजीच्या (Panjim) ‘सुनापरान्त गोवा सेंटर ऑफ आर्ट’ ने झुरीच येथील कलासंयोजक ॲड्रियन नॉझ यांचे ‘जेनेसिस दादा - लेसन्स लर्न्ट’ या विषयावर आज संध्याकाळी 6 वाजता व्याख्यान आयोजित केले आहे.

‘दादा’ चळवळीचे जन्मस्थान ठरलेला ‘कॅबरे व्होल्तेआर’ हा क्लब जवळजवळ 100 वर्षानंतर 2004 साली, झुरीच इथे पुन्हा सुरू करण्यात आला. या ‘चळवळीच्या सांस्कृतिक वारशाचा कारभार अ‍ॅड्रियन यांनी सांभाळला. ‘सुनापरान्त...’मध्ये होणाऱ्या व्याख्यानात अ‍ॅड्रियन, आपला ह्या कामाचा अनुभव आणि आजच्या काळात, कलेतली ही चळवळ पुन्हा कशी सक्रिय केली जाऊ शकते याबद्दल आपल्या व्याख्यानातून आपले विचार मांडतील. ‘दादाइजम’चे सक्रिय होणे, भूतकाळातील उच्च सांस्कृतिक आणि कलात्मक आघाड्यांना पूर्ववत बनवेल असा विश्‍वास त्यांना वाटतो. कलाविश्‍वातल्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या चळवळीचे स्वरूप समजून घेण्यासाठी आणि कलेतले भविष्यकालीन प्रवाह समजून घेण्यासाठी हे व्याख्यान निश्‍चितच उपयोगी ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT