Curry Leaves / Kadi Patta Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Curry Leaves: कढीपत्त्याची पाने त्वचेच्या समस्येवर ठरतात लाभदायक! फक्त योग्य वेळ जाणून घ्या

Curry Leaves: अनेकजण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. तुमच्या इतर समस्यासारखेच या त्रासावरदेखील कढीपत्ता उपयुक्त ठरतो.

दैनिक गोमन्तक

Curry Leaves: आपल्या घरात आणि आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींचा किंवा आपण खात असलेल्या पदार्थांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.

आपल्या रोजच्या वापरात असणाऱ्या पदार्थाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. मात्र या पदार्थांची खाण्याची योग्य वेळ माहीती नसल्याने त्याचे फायदे आपल्या शरीराला पोहचू शकत नाहीत. कढीपत्ता हा त्यापैकी एक आहे.

कढीपत्त्याचा वापर त्याच्या सुगंधामुळे प्रत्येक भाजीत केला जातो. मात्र कढीपत्त्याचे सकाळी सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक आरोग्य तज्ञ आपल्याला रोज सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ५ कढीपत्ता चावण्याचा सल्ला देतात.

१. त्वचेच्या समस्या दूर होतील

कढीपत्त्याच्या सेवनाने त्वचेच्या समस्यांपासून देखील आराम मिळतो, ही पाने रोज खाल्ल्याने त्याचा आपल्या त्वचेवर अत्यंत चांगला फायदा होतो. त्वचेवर फोड किंवा पिंपल्स दिसू लागल्यास ही पाने बारीक करून त्या भागावर लावा. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होतात.

२. पोटदुखीपासून आराम

आपल्याला अनेकदा पोटदुखीचा त्रास जाणवतो मात्र कारण समजत नाही. पोटदुखीवर आराम मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा चांगला वापर करु शकता.

जेव्हा पोटदुखीचा त्रास होत असेल तेव्हा एका पातेल्यात पाणी उकळून त्यात कढीपत्ता टाका. उकळल्यानंतर पाणी अर्धे झाले की ते गाळून कोमट झाल्यावर त्याचे सेवन करावे. यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतील.

३. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अनेकजण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. तुमच्या इतर समस्यासारखेच या त्रासावरदेखील कढीपत्ता उपयुक्त ठरतो.

तुम्ही सकाळी उठल्यानंतर ही पाने खाल्ली तर तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करते. याबरोबरच तुमची चयापचय शक्तीदेखील वाढेल. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

४. मधुमेह नियंत्रित राहील

मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. हवे असल्यास कढीपत्ता उन्हात वाळवा आणि नंतर त्याची पावडर करून साठवून तुम्ही त्याचा उपयोद करु शकता.

५. केसांसाठी फायदेशीर

कढीपत्त्याला केसांच्या समस्येसाठीदेखील फायदेशीर मानले जाते. ज्यांना केसगळतीची समस्या आहे. ज्यांना केसात कोंडा होतो किंवा केसांच्या इतर समस्यांसाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. निरोगी केसांसाठी रोज कढीपत्ता खाल्ला तर त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो.

६. जखमांवर फायदेशीर

जर तुम्हाला कोणती जखम झाली असेल, त्वचा जळाली असेल किंवा त्वचेची जळजळ होत असेल तरीदेखील कढीपत्ता उपयोगी ठरतो.

कढीपत्त्याच्या या फायद्यांसहित तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि तुमच्या निरोगी यकृतासाठीदेखील कढीपत्त्याचा उपयोग होतो.

कढीपत्त्यामध्ये 'हे' असतात पोषक घटक

व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह, तांबे, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट्ससारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT