Cucumber Eating Facts Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cucumber Eating Facts: शरीराला फायदेशीर असणारी काकडी खाण्याचीही असते वेळ; यावेळी खाल्यास होईल नुकसान

तुम्हाला माहितीये का काकडी खाण्याचीही वेळ असते.

दैनिक गोमन्तक

Cucumber Calories: काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे यात शंका नाही. सॅलडमध्ये तर काकडी आवर्जून असतेच. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. परंतु त्याचे सेवन करताना अनेक लोक चुका करतात. तुम्हाला माहितीये का काकडी खाण्याचीही वेळ असते.

यावेळी काकडी खाऊ नका

काकडी आरोग्यासाठी सर्वच बाबतीत फायदेशीर असली तरी ती नेहमी दिवसा खावी, त्यामुळे शरीराला अनेक प्रकारची पोषकतत्त्वे मिळतात, तर रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास शरीराला फायद्याऐवजी नुकसान होईल.

रात्री काकडी का खाऊ नये

1. पचनावर परिणाम

काकडीत Cucurbitacin असते जे तुमची पचनशक्ती खूप मजबूत असेल तेव्हाच पचवता येते अन्यथा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तविक, रात्री काकडी खाल्ल्याने पोट जड होते, मग तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन किंवा पोट फुगण्याची तक्रार होऊ शकते. म्हणूनच दिवसा काकडी खा.

2. झोपेवर परिणाम

जर तुम्ही रात्री काकडी खाल्ल्यास आरामात झोपणे कठीण होईल कारण पोट जड झाल्यामुळे झोपणे आणि वळण्यास त्रास होतो. याशिवाय, पचन खराब असेल तर गॅसमुळे तुम्हाला झोप येत नाही. काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने रात्री लघवी करावी लागते, त्यामुळे झोपेचा त्रास होतो.

दिवसा काकडी खा

बहुतेक आरोग्य तज्ञ काकडी फक्त दिवसा खाण्याची शिफारस करतात, कारण तिच्याशी संबंधित अनेक आरोग्य फायदे आहेत. काकडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते, त्यामध्ये असलेल्या 95% पाण्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवता येते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, कॅन्सरपासून बचाव आणि मजबूत हाडे यांसारखे फायदेही काकडीशी संबंधित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT