Ayurvedic Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Covid-19 JN1: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटपासून दूर राहण्यासाठी करा 'हे' 5 आयुर्वेदिक उपाय

कोरोनाचा नवा प्रकार वाढत असून कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Covid-19 JN1: देशात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रूग्ण वाढत आहे. तसेच हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने सर्दी,खोकला सारखे आजार अटॅक करतात. हे टाळण्यासाठी कोणते आयुर्वेदिक उपाय करावे हे जाणून घेऊया.

'या' लोकांना कोरोनाचा धोका

हिवाळ्यातील प्रदूषणासोबतच वाढती थंडीही लोकांना अनेक आजारंना बळी पाडत आहे. त्यामुळे लोकांना डोकेदुखी, खोकला, ताप, सर्दी, खोकला, छातीत जड होणे, न्यूमोनिया, दमा अशा समस्या होत आहेत. विशेषत: लहान मुलं आणि वृद्धांसाठी हा कठीण काळ आहे. 

कोरोनाचा नवीन व्हेरियंट अशा लोकांना झपाट्याने आपल्या नियंत्रणात घेत आहे. भारतातील केरळमध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गाची 20 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. 

याशिवाय महाराष्ट्रासह इतर राज्यातही त्याचा धोका वाढत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी WHO ने मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत. लोकांना मास्क लावून, हात स्वच्छ ठेवणे, खोकला आणि सर्दी झालेल्या रुग्णांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मजबूत रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला या संसर्गाशी लढण्यास मदत करू शकते. यापासून वाचवू शकते. यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.

फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा समावेश करावा. याशिवाय रोज व्हिटॅमिन डी घ्यावे. हिरव्या भाज्या खाव्या. हळदीचे दूध नियमित प्यावे. दिवसातून एकदा तरी गिलॉयचा रस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. तसेच संसर्गाशी लढण्याची ताकद मिळेल.

सर्दी-खोकला झाल्यास काय करावे

हिवाळ्यात सर्दी किंवा खोकला झाल्यास थंड पाणी पिणे बंद करावे. त्याऐवजी कोमट पाणी प्यावे. दररोज मीठाने गार्गिल करावे. हळदीचे दूध पिण्याबरोबरच आलं, दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि तुळस एकत्र करून त्याचा काढा बनवा. याचे नियमित सेवन करावे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढल्याने कोरोनाचा धोकाही बऱ्याच अंशी कमी होईल. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवा

कोरोनासारख्या संसर्गाशी लढण्यासाठी व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असली पाहिजे. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तुम्ही हा संसर्ग टाळू शकता. तुम्ही आयुर्वेदाची मदत घेऊ शकता. आयुर्वेदानुसार या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकता. या आजारापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता. 

फुफ्फुस मजबूत करा

तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तुमची फुफ्फुस मजबूत करा. यासाठी रोज किमान 30 मिनिटे योगासन प्राणायाम करावे. दररोज गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी. गिलोय आणि तुळशीची पाने पाण्यात उकळवून ते पिणे देखील खूप फायदेशीर आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. त्यामुळे फुफ्फुस निरोगी राहतात. हिवाळ्यात जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका किंवा थंड पाणी, दही, ताक पिऊ नका. 

अॅलर्जी होताच या गोष्टी करा

जर तुम्हाला हिवाळ्यात अॅलर्जी असेल तर 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम साखर, 20 ग्रॅम काळी मिरी चांगले बारीक करून एकत्र करा. रोज झोपण्यापूर्वी एक चमचा चूर्ण घ्या. यामुळे अॅलर्जी, सर्दी, खोकला बरा होईल. शरीर डिटॉक्स झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT