Copper Water Benefits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Copper Water Benefits: तांब्याच्या भांड्यातील पाणी फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर

प्राचीन काळी लोक तांब्याचे भांडे जास्त वापरत. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो.

दैनिक गोमन्तक

Copper Water Benefits: प्राचीन काळी लोक तांब्याचे भांडे जास्त वापरत. याचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. हिवाळ्यात हे पाणी आरोग्यासाठी अमृतसारखं आहे.

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पिल्याने त्रिदोष म्हणजेच कफ, पित्त आणि वात नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासोबतच अनेक प्रकारचे विविध व्हायरस आणि इन्फेक्शन्सपासूनही संरक्षण मिळते. जाणून घेऊया त्याचे फायदे.

त्वचेसाठी फायदेशीर

अनेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत तांब्याच्या भांड्यात सतत काही दिवस ठेवलेले पाणी प्यायल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.

पाचक प्रणाली मजबूत

हिवाळ्याच्या हंगामात स्वादिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे लोकांना अन्न पचण्यास त्रास होऊ लागतो. अशा स्थितीत पचनक्रिया बळकट राहणे अत्यंत आवश्यक आहे. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, फ्लू सारखे आजार होतात. असे मानले जाते की तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचे रोगांपासून संरक्षण होते.

हृदयाच्या आरोग्य

तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत होते. म्हणजेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने हृदय निरोगी राहते.

अशक्तपणापासून मुक्तता

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने अॅनिमियाच्या समस्येवर आराम मिळतो. तांबे आपल्या शरीरात लोह शोषून घेण्यास उपयुक्त आहे, ज्यामुळे अॅनिमियाची समस्या लवकर दूर होते. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे फायदेशीर ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

Bird week in India: 'चला, पक्षी वाचवूया, निसर्ग जपूया'! पक्षीशास्त्राचे जनक 'डॉ. सलिम अली' यांचे स्मरण

Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे

Birsa Munda Jayanti: भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त 8000 दुचाकीस्‍वारांची शोभायात्रा! 15 नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा, कार्यक्रमांची मेजवानी

SCROLL FOR NEXT