Cooking Hacks: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cooking Hacks: स्टील पॅनमध्ये पदार्थ चिकटताय? मग फॉलो करा 'या' टिप्स

स्टीलच्या भांड्यात शिजवताना पदार्थ चिकटत असेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Cooking Hacks: स्टीलच्या पॅनमध्ये पदार्थ चिकटण्याची समस्या नेहमीच असते. म्हणूनच बहुतेक लोक नॉन-स्टिक पॅन वापरतात. पण आजही अनेक घरांमध्ये स्टीलच्या भांड्यात अन्न शिजवले जाते. स्थिलच्या पॅनमध्ये पदार्थ बनवणे अधिक कठीण काम आहे. अनेक लोक कुकरमध्येच पदार्थ बनवतात.

पण काही गोष्टी अशा आहेत ज्यांचा वापर भाजी किंवा चीला बनवण्यासाठी केला जातो, पण जर तुम्ही पदार्थ ढवळत नसाल तर पदार्थाची चव आणि पोत दोन्ही खराब होतात. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा अनेक लोकांना करावा लागतो. पदार्थ चिकटल्यामुळे पॅन खराब होऊ लागतात. परंतु ही समस्या कमी करण्यासाठी पुढील टिप्स वापरू शकता.

नॉन स्टिक पॅन

तुम्ही स्टीलचा पॅन नॉन-स्टिक पॅनप्रमाणे वापरू शकता. यासाठी स्टीलचे पॅन गरम करावे. नंतर तव्यावर थोडे पाणी शिंपडा. जर पाण्याचे थेंब शिंपडताना मोत्यासारखे उसळताना दिसले तर याचा अर्थ असा की तुमची पॅन खूप गरम झाले आहे. यानंतर पॅनमध्ये तेलाचे दोन ते तीन थेंब टाका आणि टिश्यूच्या मदतीने तव्यावर पसरवा. तुमचा स्टीन पॅन नॉन-स्टिक पॅन म्हणून तयार आहे.

पहिले भाज्या मिठाच्या पाण्यात उकळाव्या

सर्वात पहिले भाजी आधी मीठाच्या पाण्यात उकळावी. यामुळे ओलेपणा भाजीला कढईला चिकटू देत नाही. त्यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच शिवाय गॅसही कमी लागेल.

मंद आचेवर पदार्थ बनवावे

पॅनमध्ये पदार्थ बनवतांना नेहमी मंद आचेवर ठेवावे. मंद आचेवर पदार्थ ठेवल्याने तुमचा पदार्थ तर चांगले शिजतेच पण ते चिकटणार नाही. त्याच बरोबर जास्त आचेवर पदार्थ बनवले तर बाहेरून शिजते पण आतून कच्चे राहते. म्हणून मंद आचेवर पदार्थ शिजवावे आणि वरून पॅन झाकावे. असे केल्याने वाफ बाहेर पडत नाही आणि ती आत राहिल्याने भाजी लवकर शिजते.

स्टिल पॅन कसा स्वच्छ करावा

स्टिल पॅन स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक चांगला पर्याय आहे. जरी तुम्ही ते अनेक प्रकारे वापरू शकता.

पद्धत

खराब झालेला पॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता.

यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी भरावे.

नंतर त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि मंद आचेवर शिजवावे.

20 ते 30 मिनिटे उकळू द्यावे.

तुमचा पॅन साफ ​​होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT