Conjunctivitis Disease Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Conjunctivitis Disease: डोळ्यांचा काय आहे कंजक्टिवाइटिस आजार? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय!

Conjunctivitis Symptoms And Prevention: डोळे हा आपल्या शरीराचा एक अतिशय नाजूक भाग आहे. डोळ्यांचा किरकोळ आजार देखील गंभीर समस्या निर्माण करु शकतो. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे लगेच जाणवतात.

Manish Jadhav

डोळे हा आपल्या शरीराचा एक अतिशय नाजूक भाग आहे. डोळ्यांचा किरकोळ आजार देखील गंभीर समस्या निर्माण करु शकतो. डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची लक्षणे लगेच जाणवतात. उन्हाळा आणि पावसाळ्यात डोळ्यांचा हा आजार झपाट्याने पसरतो. या आजाराला कंजक्टिवाइटिस असे म्हणतात. हा आजार सामान्य आहे, परंतु जर तो झाला तर डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. चला तर मग या आजाराची लक्षणे काय आहेत आणि तो आजार कसा टाळायचा याबाबत जाणून घेऊया...

डोळ्यांमध्ये एक पातळ पारदर्शक पडदा असतो. ज्याला कंजंक्टिव्हा म्हणतात. तो आपल्या पापण्यांच्या आतील भागांना आणि डोळ्याच्या बाहुलीच्या पांढऱ्या भागाला व्यापतो. जेव्हा कंजक्टिवामध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा हा आजार होतो.

डोळ्यांमध्ये खाज सुटणे

जेव्हा कंजक्टिवाच्या लहान रक्तवाहिन्या सुजतात तेव्हा त्या स्पष्टपणे दिसतात. या स्थितीत डोळ्यांचा (Eye) पांढरा भाग गुलाबी किंवा लाल दिसू लागतो. ही समस्या बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे होते. या स्थितीत, रुग्णाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागते आणि त्याचबरोबर तीव्र खाज सुटू लागते. अनेक वेळा त्यामुळे त्याला पाहण्यातही समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत या समस्येवर तात्काळ उपचार करणे गरजेचे ठरते.

आजाराची लक्षणे कोणती?

जेव्हा कंजक्टिवाइटिस होतो तेव्हा काही लक्षणे स्पष्टपणे दिसतात. जेव्हा हा आजार होतो तेव्हा एका किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये लालसरपणा स्पष्टपणे दिसून येतो. यासोबतच डोळ्यांमध्ये खाज सुटणे आणि जळजळ होणे देखील होते. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. कधीकधी हे पाणी जाड आणि चिकट देखील असते. असे दिसते की, जणू काही धूळ किंवा दगडाचे छोटे कण डोळ्यांत गेले आहेत. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. बऱ्याच वेळा विलंबामुळे कंजक्टिवामध्ये जखमा होऊ लागतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरते. याशिवाय, पापणीच्या आतील भागातही पुरळ उठू शकतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

स्वतःचे रक्षण कसे करावे

या आजाराने संक्रमित व्यक्तीला भेटणे टाळा. जर तुम्ही हे करु शकत नसाल तर त्याच्या वापरलेल्या रुमालाला किंवा डोळ्यांतून द्रव बाहेर पडणाऱ्या इतर कोणत्याही वस्तूला स्पर्श करु नका. नेहमी हात धुत राहा आणि नेहमी चष्मा घाला. बाहेर जाताना चष्मा घाला आणि परत आल्यानंतर हात चांगले धुवा आणि नंतर डोळे थंड पाण्याने धुवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT