Coconut Water Facial Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Coconut Water Facial: नारळाच्या पाण्याने कसे करावे फेशियल जाणून घ्या एका क्लिकवर

Skin Care Tips: नारळाच्या पाण्याने चेहऱ्यावरील वाढेल ग्लो.

दैनिक गोमन्तक

नारळ पाणी आरेग्याप्रमाणे त्वचेसाठीुध्दा लाभदायी आहे. महाग कॉस्मेटिक फेशियलशी केल्यापेक्षा तुम्ही नारळाच्या पाण्याने फेशियल केल्यास त्वचा चमकु शकते. तर मग आम्ही तुम्हाला नारळाच्या पाण्याचे फेशियल करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहोत.

* क्लीनिंग

सर्वप्रथम, नारळाच्या पाण्याने फेशियल करण्यासाठी, नारळाच्या पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. चेहऱ्यावर नारळाचे पाणी साबणाप्रमाणे लावा, हलक्या हातांनी मसाज करा आणि नंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

* टोनिंग

चेहरा (Face) स्वच्छ केल्यानंतर टोनिंग करणे खूप महत्वाचे आहे. नारळाच्या पाण्यात टोनिंग गुण जोडण्यासाठी त्यात थोडेसे गुलाबजल टाका. तुम्ही हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कॉटन बॉल वापरूनही हे टोनर चेहऱ्यावर लावू शकता.

* स्क्रब

नारळाच्या पाण्यात कॉफी मिसळून छान स्क्रब बनवा. आता कॉफी आणि नारळाच्या पाण्याचे हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.

* मसाज

चेहऱ्याची चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे मसाज. चेहऱ्याला मसाज करण्यासाठी नारळाच्या पाण्यात एलोवेरा जेल मिसळा आणि फेशियलसाठी या मिश्रणाने चांगले मसाज करा. कमीतकमी 15 मिनिटे चेहऱ्याला मसाज करा.

* फेस पॅक

या चार स्टेप्स फॉलो केल्यानंतर आता फेस पॅकची पाळी आहे. फेस पॅक बनवण्यासाठी बेसन, हळद आणि मध यामध्ये नारळाचे पाणी मिसळा. या सर्व गोष्टी एकत्र करून बारीक पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर स्वच्छ धुवा. नारळाच्या पाण्याने फेशियलचे पाच टप्पे पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक जाणवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

Goa Live News: गोव्यात बरसणार मुसळधार सरी, हवामान विभागाकडून इशारा जारी

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

SCROLL FOR NEXT