Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: 'या' गोष्टी स्वच्छ करण्यासाठी 'Shaving Cream' चा असा करा वापर

Cleaning Tips: शेव्हिंग क्रिमचा वापर पुरूष चेहऱ्यावरचे वाढलेले केस आणि मिशा काढण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहिती आहे का याचा इतर कामांसाठी देखील वापर केला जातो.

Puja Bonkile

Cleaning Tips: शेव्हिंग क्रिमचा वापर पुरूष चेहऱ्यावरचे वाढलेले केस आणि मिशा काढण्यासाठी करतात.

पण तुम्हाला माहिती आहे का याचा वापर इतर कामांसाठी देखील वापर केला जातो. तुम्ही शेव्हिंग क्रिमचा वापर करून अनेक लहान-मोठे कामे मिनिटांत पूर्ण करू शकता.

  • स्टेनलेस स्टीलची भांडी स्वच्छ करणे

स्वयंपाकघरातील अनेक भांडी स्टेनलेस स्टीलची असतात. सामान्य डिशवॉशने ते स्वच्छ करण्यासाठी खूप वेळ लागतो.

तुम्ही शेव्हिंग क्रीमचा वापर करून स्टेनलेस स्टीलची भांडी स्वच्छ करू शकता. यासाठी स्वच्छ कपड्यावर शेव्हिंग क्रीम लावून स्टेनलेस स्टीलच्या वस्तूवर घासून स्वच्छ करावे.

  • दागिने स्वच्छ करावे

जर तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने रोज घालत असाल तर काही वेळाने त्याची चमक कमी होऊ लागते.

अशावेळी घरातील सोन्या-चांदीचे दागिने चमकण्यासाठी त्यावर शेव्हिंग क्रीम हलके घासावे आणि दहा मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करा.

  • कार्पेटवरील डाग काढावे

कार्पेट वारंवार धुणे अवघड आहे. कार्पेटवर जर डाग पडले तर स्पॉट क्लिनिंग हा सर्वोत्तम उपाय आहे.

यासाठी कार्पेटवर पडलेल्या भागावर क्रीम लावावे आणि एका मिनिटानंतर टिश्यू पेपरने स्वच्छ करावे.

  • नेल पेंट

तुमच्याकडे नेल पेंट रिमूव्हर नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेव्हिंग क्रीम देखील वापरू शकता. यासाठी नेल पेंट केलेल्या भागावर शेविंग क्रीम लावावे. 2-3 मिनिटानंतर सुती कापडाने पुसून टाकावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

SCROLL FOR NEXT