Cleaning Tips: वॉशिंग मशीनमुळे महिलांच काम सोपे झाले आहे. पण अनेक वेळा अस्वच्छ कपडे स्वच्छ न होता डिटर्जंटटचे पांढरे डाग कपड्यांवर दिसतात. तुम्हीही तुमच्या कपड्यांवर कधी ना कधी असे पांढरे डाग पाहिले असतीलच. असे डाग हट्टी नसतात परंतु त्या डागांमुळे कपडे घालणे शक्य होत नाही.
हे आहे कारण
कपडे धुताना डिटर्जंट जास्त आणि कमी पाणी वापरल्यास त्यावर पांढरे डाग दिसू लागतात. याशिवाय पावडर डिटर्जंटने कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता जास्त असते. यामुळे मशीनमध्ये कपडे धुतांना काळजी घ्यावी.
डिटर्जंटचा डाग नाही राहणार
कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग घालवण्यासाठी मशीनची सेटिंग्ज योग्य आहे का तपासावे. मशीनमध्ये कपडे ओव्हरलोड होऊ देऊ नका. तसेच योग्य प्रमाणात डिटर्जंट मशीनमध्ये टाकावे.
कपड्यांवरील डिटर्जंटचे डाग कसे काढायचे
तुम्ही व्हिनेगरने कपड्यांवरील डिटर्जंटचे पांढरे डाग सहज काढू शकता. यासाठी कोमट पाण्यात एक कप व्हिनेगर चांगले मिक्स करावे आणि त्यात कपडे 15 मिनिटे भिजत ठेवावे. यानंतर डाग असलेली जागा हाताने हलके घासावे. नतंर स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करावे. डाग पूर्णपणे गायब होईल.
इतर उपाय
तुम्ही डिश शॉपमधून कपड्यांवरील डिटर्जंटचे पांढरे डाग देखील काढू शकता. यासाठी डाग पडलेला भाग 5 मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. नंतर डिश सोपने घासावे. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. डिश सोपऐवजी तुम्ही आंघोळीचा साबण देखील वापरू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.