Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: मशीनशिवाय करू शकाल कार्पेट स्वच्छ, फक्त करा 'हे' काम

कार्पेट स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वजण क्लीनर किंवा मशीनचा वापर करतो. आपण घरच्या घरी कार्पेट कसे स्वच्छ करू शकता हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Cleaning Tips: घराची शोभा वाढवण्यासाठी विविध वस्तूंचा वापर केला जातो. तसे तर कार्पेटमुळे घराची शोभा अधिक वाढते. पण कार्पेट स्वच्छ करणे सोपे नाही. काही कार्पेट्स इतके जड असतात की दर आठवड्याला धुवू शकत नाही किंवा त्यांना ड्राय क्लीनिंगला देऊ शकत नाही. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.

  • दररोज कार्पेट डस्टिंग करा

जर तुम्ही दररोज कार्पेट वापरत असाल तर दररोज धूळ स्वच्छ करणे गरजेचे आहे. हे कार्पेटवर मातीचा थर तयार होण्यास प्रतिबंध करेल. ते स्वच्छ करण्यासाठी मऊ ब्रश वापरावा. याशिवाय तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर देखील वापरू शकता. जर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वच्छ केले तर तुम्हाला जास्त स्वच्छता करण्याची गरज नाही.

  • व्हिनेगरचा वापर

जर कार्पेटवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर तुम्ही ते व्हिनेगर आणि लिंबाच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी सर्वात पहिले डाग असलेली जागा कापडाच्या साहाय्याने पुसून स्वच्छ करा. यानंतर सूती कापड व्हिनेगरमध्ये भिजवा आणि डाग असलेल्या भागावर घासून घ्या.

  • अमोनिया वापरा

जर घरामध्ये कार्पेटवर पदार्थांचा डाग असेल तर तुम्ही अमोनियाच्या मिश्रणाच्या मदतीने हा डाग स्वच्छ करू शकता. यासाठी सर्वात पहिले एका भांड्यात पाणी घ्यावे, आता त्यात दोन चमचे अमोनिया टाका आणि मिश्रण तयार करा. यानंतर लिक्विड साबण टाकून चांगले मिक्स करावे. आता ब्रशच्या मदतीने डाग असलेल्या भागावर घासून घ्या.

  • टॅल्कम पावडरचा वापर

कार्पेटवरील ओलावा काढून टाकण्यासाठी टॅल्कम पावडरचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी कार्पेटवर असलेल्या ओलसर भागावर पावडर शिंपडावे. यानंतर व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने स्वच्छ करा टॅल्कम पावडर केवळ ओलावाच नाही तर डागही दूर करते.

  • डिटर्जंट वापरू शकता

जर कार्पेट खूप अस्वच्छ असेल तर ते पाण्यात भिजवा. यानंतर तुम्ही लिक्विड डिटर्जंटच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT