Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cleaning Tips: तुम्हीही कपडे धुण्यापूर्वी रात्रभर डिटर्जंटमध्ये भिजवून ठेवताय?

जर तुम्ही तुमचे कपडे धुण्यापूर्वी रात्रभर डिटर्जंटच्या पाण्यात भिजवून ठेवत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा

Puja Bonkile

Cloths Cleaning Tips: नाजूक फॅब्रिक असलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुता येत नाही. यामुळे ते नेहमी हाताने धुवावे लागतात. पण तुम्ही ते तुमच्या हातांनी कसे धुता हे खूप महत्वाचे आहे. जसे कपडे जास्त वेळ डिटर्जंट पाण्यात भिजवून ठेवण्याची अनेक लोकांना सवय असते.

साधारणपणे अनेक लोक ही चूक करतात. तुम्हीही असा विचार करत असाल की डिटर्जंटमध्ये कपडे जास्त वेळ भिजवल्याने कपडे लवकर स्वच्छ निघतात तर असे होत नाही. उलट कपड्यांची गुणवत्ता खराब होऊ शकते.

काय परिणाम होईल?
कपडे पाणी आणि डिटर्जंटमध्ये धुतल्यास स्वच्छ निघतात. पण डिटर्जंटमध्ये कपडे जास्त वेळ भिजवले तर ते खराब होतात. तसेच कपडे लुज होणे आणि रंग फिका होणे यांचा समावेश होतो. याशिवाय कपडे धुतल्यानंतर त्यातून दुर्गंधी देखील येऊ शकते.

कपडे धुण्यापूर्वी पाण्यात किती वेळ भिजवावे?
कपडे धुण्यापूर्वी जास्तीत जास्त 30-60 मिनिटे कपडे भिजवणे योग्य आहे. कपड्यांचे फॅब्रिक आणि त्यात असलेली घाण यावर अवलंबून ही वेळ बदलू शकते. उदाहरणार्थ, लेस असलेले कपडे फक्त 2-3 मिनिटे पाण्यात भिजवावे, रेशमी आणि लोकरीचे कपडे 30 मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात सोडू नयेत तर कॉटन आणि इतर कमी संवेदनशील कापड 60 मिनिटे पाण्यात भिजवावे.

कपडे पाण्यात भिजवण्यापूर्वी या गोष्टी करा

कपड्यांवरील डाग पाण्यात भिजवण्यापूर्वी नेहमी स्वच्छ करावे. तसेच, डार्क कपड्यांसह हलके कपडे कधीही भिजवू नका. संवेदनशील फॅब्रिक रफ फॅब्रिकसोबत भिजवण्याची चूक कधीही करू नका.यामुळे कपडे खराब होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT