Christmas in goa

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Christmas: गोव्यातील ख्रिसमस

पणजीत मळा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपेलच्यासमोर दिवाळी-ख्रिसमसच्या निमित्ताने उभे राहणारे भव्य देखावे तर लोकांच्या आकर्षणाचे विषय असतात.

दैनिक गोमन्तक

येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा, चौकात उभारलेल्या भव्य ‘ख्रिसमस ट्री’(christmas tree) त्यांच्या भोवतालची रोषणाई इत्यादी पहात व त्यांचा कलात्मक आस्वाद घेत, त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार सांडत कुटुंबकफिल्यांचे भ्रमण आजपासून सुरू होईल. या दिवसात गोव्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर प्रकाशमान रंगीत नक्षत्रे आपल्याला रांगेने दूरपर्यंत साथसंगत करतील. दक्षिण गोव्यातील (Goa) रस्त्यांवर विशेषतः पणजीत मळा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चॅपेलच्यासमोर दिवाळी-ख्रिसमसच्या (christmas) निमित्ताने उभे राहणारे भव्य देखावे तर लोकांच्या आकर्षणाचे विषय असतात.

यावर्षी तिथे उभारण्यात आलेली उत्तुंग ‘ख्रिसमस ट्री’ (christmas tree) सर्वांच्याच कौतुकाचा विषय झाली आहे. आगशी येथे पुलाच्या अलीकडे ख्रिसमसच्या काळात मांडण्यात येणारी हजारो नक्षत्रे पाहण्यास शेकडो लोक तिथं भेट देतात. तिथला सारा अवकाश या नक्षत्रांमुळे प्रकाशमान झालेला असतो. या नक्षत्रांसमोर काही काळ आकाशातली नक्षत्रेदेखील फिकी पडतात. माणसांच्या सुखदुःखाचे प्रमाण काही असो पण अशा उत्सवांच्या दिवसात त्यांच्याही अंतरात काहीतरी तेवतेच. तेवढाच प्रकाशोत्सव मग ह्रदयात आनंदाला वाट मोकळी करून देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT