Christmas Celebration 2023: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Celebration 2023: गोव्यासह भारतातील 'या' ठिकाणी होते ख्रिसमसचं स्पेशल सेलिब्रेशन

ख्रिसमसचे सेलिब्रेशन जगभर पाहायला मिळते, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या ठिकाणी तुम्ही खूप खास ख्रिसमस सेलिब्रेशन पाहू शकता.

Puja Bonkile

Christmas Celebration 2023: डिसेंबर महिन्यात नवीन वर्ष आणि ख्रिसमसनिमित्त सुट्ट्या असतात. यंदा 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसला तीन दिवसांची सुट्टी मिळत आहे. ख्रिसमस सोमवारी येत आहे. त्यामुळे तुम्ही लाँग वीकेंडचा आनंद घेऊ शकता. जगभरात ख्रिसमस खास पद्धतीने साजरा केला जातो. गोव्यासह भारतात कुठे खास पद्धतीने साजरा केला जातो ते जाणून घेऊया.

गोवा

गोवा प्रसिद्ध पर्यंटन स्थळापैकी एक आहे. येथे तुम्हाला समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती, लोककला, गोवनफुड, चर्च, किल्ले यासारख्या विविध गोष्टींचा अनुभव घेता येईल. देश-विदेशातील पर्यटक ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात येतात. इथे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमस दरम्यान केवळ चर्चच नाही तर रस्त्यांवर आणि इमारतींवरही रंगीबेरंगी सजावट पाहायला मिळते.

पाँडिचेरी

पाँडिचेरीला भारताचा "छोटा फ्रान्स" असेही म्हणतात.  फ्रेंच लोकांनी येथे दीर्घकाळ राज्य केले. येथे मोठ्या संख्येने ख्रिश्चन लोक राहतात, त्यामुळे ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुम्ही ख्रिसमस लाँग वीकेंडमध्ये येथे ट्रिप प्लॅन करू शकता. येथे भेट देण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे आहेत.

सिक्कीम

ईशान्य सिक्कीममध्ये येऊन तुम्ही ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. डिसेंबर महिन्यात सिक्कीममध्ये खूप थंडी असते, इथे ख्रिसमसचा सण खूप छान साजरा केला जातो. तसेच इतर ठिकाणांनाही भेट देऊ शकता. यामुळे तुमचा विकेंड देखील अविस्मरणीय होईल.

केरळा

केरळ हे भारतीयांचे सर्वात आवडते शहर आहे. तुम्हीही खूप दिवसांपासून इथे येण्याचा विचार करत असाल, तर ख्रिसमस ही सर्वोत्तम संधी आहे. येथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्माचे लोक राहतात. त्यामुळे या उत्सवाची भव्यता येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक चर्चमध्ये पाहायला मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Abhinav Tejrana Double Century: रणजी पदार्पणातच ठोकलं द्विशतक, तेंडुलकर, कोहलीला जे जमलं नाही, ते करुन दाखवलं; अर्जुन तेंडुलकरनंतर गोव्याचा 'अभिनव' चमकला

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

SCROLL FOR NEXT