Christmas Tree Decoration Ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Tree Decoration Ideas: यंदा हटके स्टाईलने सजवा ख्रिसमस ट्री

ख्रिसमसचा सण जवळ येत आहे आणि दरवर्षी हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Puja Bonkile

Christmas Tree Decoration Ideas: दरवर्षी 25 डिसेंबरला हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुले या दिवसासाठी खूप उत्सुक असतात. या दिवशी ख्रिसमस ट्री ला खास पद्धतीने सजावट केली जाते. यंदा तुम्हाला खास पद्धतीने ख्रिसमस ट्री सजवायचा असेल तर पुढील गोष्टी फॉलो करू शकता.

फुलं आणि फळांचा वापर


जर तुम्हाला ख्रिसमस ट्री स्वस्त आणि सुंदर पद्धतीने सजवायचा असेल तर तुम्ही ख्रिसमस ट्री फुलं आणि फळांनी सजवू शकता. पांढरी आणि लाल फुले तुमच्या ख्रिसमस ट्रीचे सौंदर्य वाढवू शकतात.


फॅमिली फोटो


यंदा प्रत्येकाने तुमच्या ख्रिसमस ट्रीचे कौतुक करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यावर फॅमिली फोटो लावू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो रंगीबेरंगी धागे किंवा रिबनने बांधून ख्रिसमसच्या झाडावर लावू शकता.

लाइटिंग


जर तुम्हाला तुमचा ख्रिसमस ट्री पैसे खर्च न करता सजवायचा असेल तर तुम्ही तुमच्या दिवाळीच्या सजावटीचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही ख्रिसमसच्या झाडाला लाइटिंगने सजवता तेव्हा ते खूप सुंदर दिसेल.


टॉफी आणि चॉकलेटने सजवा


या ख्रिसमसला तुम्ही तुमचा ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी टॉफी आणि चॉकलेट वापरू शकता. तुम्ही त्यांना झाडावर लावू शकता. ज्यामुळे तुमचा ख्रिसमस ट्री वेगळा दिसेल आणि प्रत्येकजण त्याचे कौतुक करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smuggling: कालेत खैरीच्‍या झाडांची तस्‍करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; तिघांना अटक

Vasco: मासेमारी सुरू होऊनही खारीवाडा जेटीवर सामसूम, 75 टक्के ट्रॉलर्स उभेच; परप्रांतीय कामगारांची प्रतीक्षा

Goa Live Updates: 'फ्रेंडशिप डे' च्या शुभेच्छा!

Old Goa: 'मास्टर प्लॅन'ची त्‍वरित अंमलबजावणी करा, 'सेव्ह ओल्ड-गोवा' कृती समितीची सरकारकडे मागणी

Quepem: केपे गणेशोत्‍सवाची लॉटरी ठरली 'हिट', काही तासांतच 1.5 लाख तिकिटांची विक्री

SCROLL FOR NEXT