Ultraviolette F77 Space Edition Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chandrayaan 3 च्या सन्मानार्थ लाँच केली इलेक्ट्रिक बाइक; जाणून घ्या जबरदस्त फिचर

चांद्रयान-3च्या सन्मानार्थ Ultraviolette f77 स्पेस एडिशन ही इलेक्ट्रिक बाइक लाँच करण्यात आली आहे. फक्त 10 बाइक विकल्या जाणार आहे.

Puja Bonkile

Ultraviolette F77 Space Edition: आज चांद्रयान-3 चंद्रावर लँड होणार असून आजचा दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यास भारत इतिहास रचणार आहे.

दरम्यान चांद्रयान-3 च्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्ट-अप Ultraviolette Automotive ने आपल्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक बाइक F77 चे नवीन स्पेस एडिशन लाँच केले आहे. या बाइकला एरोस्पेस ग्रेड मटेरियलपासून बनवले आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईकबद्दलचे जबरदस्त फिचर कोणते आहेत.

  • F77 Space Edition मध्ये काय खास आहे?

कंपनीने या बाइकला स्पेस एडिशन असे नाव देऊन चांद्रयान-3 ला समर्पित केले आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि विशेषत: इस्रो आणि या मोहिमेशी संबंधित सर्व लोकांच्या अथक परिश्रमाच्या सन्मानार्थ या इलेक्ट्रिक बाइकचे स्पेशल इडिशन लाँच करण्यात आले आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की फक्त 10 बाइक तयार केले गेले आहेत. याची किंमत 5.60 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाइकचे बुकिंग 22 ऑगस्टपासून सुरू झाले आहे.

Ultraviolette F77 Space Edition

या बाइकला आणखी आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने तिच्या लूक आणि डिझाइनमध्ये कॉस्मेटिक बदल केले आहेत. नवीन ग्राफिक्स आणि पेंट स्कीमसह येणारी ही बाईक 'F77 स्पेशल' मॉडेलसारखीच आहे. जे कंपनीने लिमिटेड एडिशन मॉडेल म्हणून फक्त 77 बाइक्स बनवले होते.

  • पावर आणि परफॉर्मस

F77 स्पेस एडिशनबाबत कंपनीचा दावा आहे की त्याची मोटर 40.5 bhp पॉवर आणि 100 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये कंपनीने 10.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. एका चार्जमध्ये ही बाइक 307 किलोमीटरपर्यंत चालू शकते. त्याचा टॉप स्पीड 152 किमी/तास आहे आणि ही बाईक फक्त 2.9 सेकंदात 60 किमी/ताशी वेग वाढवण्यास सक्षम आहे.

  • एव्हीओनिक्स

Ultraviolette F77 Space Edition मध्ये कंपनीने अॅडवान्स एअरक्राफ्ट इलेक्ट्रॉनिक्स-बेस्ड तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये बॅटरी इत्यादीसाठी अनेक फेल प्रूफ सिस्टीम बसवण्यात आले आहे. ज्यामुळे कोणताही अपघात होण्याची शक्यात कमी असते. विमानाप्रमाणे सिस्टम 9-एक्सिस IMU द्वारे रोल, पिच आणि रस्त्याचे माप घेऊ शकते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हा ही बाईक बुक करू शकता.

  • एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियम

कंपनीचा दावा आहे की Ultraviolette F77 Space Edition मध्ये एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. अॅल्युमिनियम 7075 - एक हाय डेंसिटी असलेले मटेरियल आहे. जी खूप हलकी आहे परंतु अनेक स्टील्सएवढी मजबुत आहे. त्याच्या याच गुणवत्तेमुळे ते विमाने इत्यादींमध्ये देखील वापरले जाते.

  • एरोस्पेस ग्रेड पेंट

या बाइकला परफेक्ट आणि आकर्षक लूक देण्यासाठी या बाइकमध्ये रेग्युलर पेंटऐवजी एरोस्पेस ग्रेड पेंटचा वापर करण्यात आला आहे. ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की ते कायमस्वरूपी आणि सुरक्षित आहे. हा हाय क्वॉलिटीचा पेंट असून गंजरोधक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

SCROLL FOR NEXT