गोव्यासाठी विमान प्रवास महागला! नाताळच्या काळात तिकीट दरात मोठी वाढ; जयपूरहून येणाऱ्या पर्यटकांना बसतोय सर्वाधिक फटका

Goa flight fares increase: पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि जयपूरसारख्या प्रमुख शहरांमधून गोव्याला येणाऱ्या विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ झालीये
Goa flight prices
Goa flight pricesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa flight ticket price hike: डिसेंबरचा शेवटचा आठवडा जवळ येत असताना गोव्यातील पर्यटनाने जोर पकडला आहे. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि जयपूरसारख्या प्रमुख शहरांमधून गोव्याला येणाऱ्या विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ झालीये. विशेषतः नाताळच्या आसपास (२३ ते २५ डिसेंबर) विमान दरांनी उच्चांक गाठलेला पाहायला मिळतोय.

प्रमुख शहरांमधील विमान दरांचा आढावा:

गोव्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बंगळुरूहून २२ डिसेंबरला ३,५२१ रुपये असलेले भाडे नाताळच्या पूर्वसंध्येला (२४ डिसेंबर) ६,७६५ रुपयांवर पोहोचले आहे, तर दुसऱ्या बाजूला दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण आठवडाभर जास्त पैसे मोजावे लागत आहेत. २४ डिसेंबर रोजी हे दर ८,८३४ रुपयांपर्यंत वाढलेत.

मुंबईहून २१ डिसेंबरला ३,६७५ रुपये असलेले तिकीट २३-२४ डिसेंबरला ५,९०० रुपयांच्या पुढे गेले मात्र, ३१ डिसेंबरसाठी दर तुलनेने कमी (३,५२५ रुपये) आहेत. गवोव्याला जाण्यासाठी सर्वात महागडा प्रवास जयपूरहून असून, ३० डिसेंबरसाठी येथील विमान तिकीट १३,५९८ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

रेल्वे प्रवासाची स्थिती: वेटिंग लिस्ट ५० टक्क्यांच्या खाली

विमानासोबतच गोव्याला येणाऱ्या रेल्वे गाड्याही 'फुल्ल' झाल्या असून नाताळच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे आणि वेटिंग लिस्टवरील तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता ५० टक्क्यांहून कमी आहे. यामुळे अनेक पर्यटकांची गैरसोय होत असली, तरी रस्तेमार्गे खाजगी वाहनांनी येणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.

Goa flight prices
Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

सुरक्षेसाठी गोवा पोलिसांचा 'मास्टर प्लॅन'

पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन गोवा पोलिसांनी किनारपट्टीच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर जादा पोलीस दले आणि १० आयआरबी (IRB) प्लाटून्स तैनात करण्यात आल्यात. मार्केट, रेल्वे स्थानके आणि बस स्थानकांवर रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे, जेणेकरून पर्यटकांची सुरक्षितता जपली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com